तोट्यातील बँक आणली नफ्यात ; बँकेने प्रगतीचा उच्चांक गाठला
मूल : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रगतीचा उच्चांक गाठला असून चार वर्षांपूर्वी तोट्यात असलेली बँक संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात नफ्यात आली आहे.मागील चार वर्षांपूर्वी बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. संचालकाच्या मागणीने गुन्हा दाखल होऊन जेलवारीसुद्धा करावी लागली. परिणामतः बँक तोट्यात होती. थकबाकीदारांवर कर्ज वाढले. अशा परिस्थितीत बँकेची धुरा सांभाळण्याकरिता संचालक मंडळातील संचालक पुढे यायला धजावत नव्हते. मात्र अनेक वर्षापासूनचा सहकार क्षेत्रातील अनुभव पाठीशी असलेले संतोषसिंह रावत यांनी 15 सप्टेंबर 2020 रोजी सीडीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घेतली.
अध्यक्षपद मिळताच त्यांनी काटेकोरपणे नियोजन करीत थकबाकीदारावरील कर्ज वसूल केले. शेतकरी हिताच्या विविध योजना राबविल्या त्यामुळे बँक जवळपास ९५ कोटी रुपयांनी यावर्षी नफ्यात आहे. त्यामुळे बँकेच्या सभासदांना ६ टक्के लाभांश वितरित केला जाणार असल्याची माहिती जनसंवादशी बोलताना रावत यांनी दिली.
0 Comments