मुल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या नोकर भरतीची वास्तविकता न तपासता संतोषसिंह रावत यांच्या चुकीच्या निर्णयामुळे काँग्रेसची गोची, नोकर भरती मधून आरक्षण हटवले, अशा प्रकारचे निराधार वृत्त प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करून काही मंडळी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत बँकेच्या प्रगती मध्ये बाधा पोहोचवण्याचे काम हेतुपुरस्सर करीत असल्याचे मत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.
बँकेची निकड आणि मागणी लक्षात घेवुन बँकेतील रिक्त पद भरण्यासाठी प्रशासनाने शासन नियमाचे पालन करत शासन स्तरावर पाठपुरावा केला. दरम्यान काही सत्ताधारी मंडळींनी नोकर भरतीला प्रखर विरोध दर्शविल्याने सदरची भरती आज पर्यंत होऊ शकली नाही. शेवटी बँकेची वास्तविकता परिस्थिती लक्षात घेऊन न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने आवश्यक असलेली पदे भरण्यासाठी बँकेला परवानगी दिली. शासनाच्या त्या परवानगी पत्रानुसार नोकर भरतीची प्रक्रिया पारदर्शकपणाने सुरू आहे. असे असताना काही मंडळी नोकर भरती मधून आरक्षण हटविले, असे कारण समोर करून हेतुपुरस्सर बदनाम करण्याचे उद्देशाने निराधार वार्ता प्रसारित करीत आहेत.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १९ मार्च २०१९ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत पारित झालेल्या ठरावानुसार महाराष्ट्र शासनाचे बँकेकडे असलेले शासकीय भाग भांडवल (Govt. Shears) रक्कम रुपये १२ लाख ७१ हजार भरणा केलेला आहे. शासकीय नियमानुसार ज्या सहकारी बँकेकडे शासनाचे भाग भांडवल शिल्लक नाही, त्या बँकांना आरक्षण नियम नियम २००१ लागू होत नाही. असे असताना नोकर भरतीला लागू असलेल्या आरक्षण बिंदू नामावली संदर्भात मार्गदर्शन करावे म्हणून दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी बँक प्रशासनाने सहकार आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार केला. तेव्हा शासनाचे सहकार आयुक्त यांनी शासनाचे विधी व न्याय विभाग आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे नोकर भरतीची कार्यवाही करावी, असे बँक प्रशासनाला निर्देश दिले. ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे शासनाचे भागभांडवल नाही, त्यांना आरक्षण अधिनियम २००१ चे नियम लागू होत नाही. असा स्पष्ट निर्वाळा असताना राज्य शासनाचे सहकार आयुक्त पुणे यांचे पत्र क्रमांक १७५९ दिनांक २८ सप्टेंबर २०२१ आणि शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या निर्देशानुसार नोकर भरती संदर्भात बँक प्रशासन सकारात्मक आणि पारदर्शीफणाने कार्यवाही करीत आहे. असे असताना काही मंडळी शासनाच्या सदर पत्राचे अवलोकन अवलोकन किंवा वास्तविकता न तपासता काँग्रेसने शब्द पाळला. आरक्षण हटविले, अश्या आशयाच्या खोट्या बातम्या प्रसार माध्यमाद्वारे प्रसारित करून बेरोजगार युवक आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधकांची ही कृती धादांत चुकीची, नागरिकांमध्ये गैरसमज पसरविणारी आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मी बल्लारपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्रामधुन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवित असल्याने मला बदनाम करण्यासाठी खोट्या आणि निराधार बातम्या प्रसारित करीत असल्याचे मत जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले असून नागरिकांनी विरोधकांच्या खोट्या भुलथापांना बळी न पडता वास्तविस्ता लक्षात घेऊन सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.
0 Comments