Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

देवीच्या विसर्जनासाठी गेला अन् लापता झाला ; मूल तालुक्यातील घटना ;शोधकार्य सुरुच

देवीच्या विसर्जनासाठी गेला अन् लापता झाला ; मुल तालुक्यातील घटना ;शोधकार्य सुरुच

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील चक दुगाळा येथील युवा शेतकरी दिलीप सातपुते वय 42 याचा दुर्गा देवी विसर्जन दरम्यान पाण्यात बुडून लापता झाल्याची घटना आज 13 रोजी रविवारला सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे गावात सर्वत्र हळ हळ होत असून शोककळा पसरली आहे. पोलिस चमू घटना स्थळी दाखल होत शोध कार्य सुरू केले असून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बुडणाऱ्या व्यक्तीचा वृत्त लीहिस्तोवर शोध लागलेला नाही.

सर्वत्र गावोगावी ठीक ठिकाणी दुर्गा मातेचे विसर्जन मोठ्या उत्साहात व थाटामाटात चालू आहे. आज रविवारी ता. 13/10 लां सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास दुगाळा येथील महिला व पुरुष यांनी दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दुर्गा देवीचे मोठ्या थाटामाटात वाजत गाजत मिरवणूक काढत गावा जवळून वाहत जाणाऱ्या गोशीखुर्द नहरात विसर्जन करण्यासाठी लोक देवीला घेऊन गेले असता सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास कालव्यातील पाण्याचे प्रमाण न कळल्यामुळे दुगाळा येथील शेतकरी दिलीप सातपुते हे पाण्यासोबत वाहून गेले असल्याची घटना घडली आहे. दिलीप सातपुते हे दुगाला येथील ग्रामपंचायत सदस्य असून गाव व परिसरात सर्वत्र हळहळ होत आहे. बघ्यांची मोठी गर्दी घटना स्थळी झाली असून पोलिस चौकी बेंबाळ कडून सातपुते यांचं शोध सुरू आहे.

Post a Comment

0 Comments