Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

डोंगरगाव घाटावर अवैध रेती उत्खनन ; नदीत जायला रस्ता केला तयार ; प्रशासनाचे दुर्लक्ष

डोंगरगाव घाटावर अवैध रेती उत्खनन ; नदीत जायला रस्ता केला तयार ; प्रशासनाचे दुर्लक्ष

मूल (अमित राऊत)


मूल तालुक्यातील डोंगरगाव रेती घाटातून अवैद्य रेती उत्खनन होत असून शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. नदीत जायसाठी रेती तस्करांनी रस्ताही तयार केल्याची माहिती आहे. स्थानिक प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रेतीचे अवैद्य उत्खनन करणे यावर बंदी असून कोणत्याही प्रकारे अवैध्य उत्खनन केल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. परंतु तालुक्यातील डोंगरगाव नदी घाटातून गावालगतच असलेल्या काही रेती तस्करांनी नदीतून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करीत आहे. स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही शेतकऱ्यांनाही त्याचा त्रास होत असल्याचा आरोप होत आहे.

रात्री होत असलेल्या अवैध वाहतुकीने आणि वाहनांचे आवाजाने स्थानिक नागरिकांना, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.  रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतकऱ्यांना कमालीचा त्रास होत आहे. अवैद्य  रेतीचे उत्खनन, वाहतुकीवर प्रतिबंध घालून रेती तस्करांवर कठोर कारवाई करावी अशी विनंती स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments