Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य गौरवास्पद — रमेशजी चेन्नीथाला

चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य गौरवास्पद — रमेशजी चेन्नीथाला

चंद्रपूर प्रतिनिधी
 
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी खासदार रमेशिजी चैनिथाला यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भेट दिली. याप्रसंगी बँकेचे कार्य, प्रशासन, शिस्त,पाहून आनंद व समाधान व्यक्त केला. रमेशजी चेनिथाला यांनी बँकेला सदिच्छा भेट दिली.यावेळी शुभेच्छा देत चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्य गौरवास्पद असल्याचे रमेशजी चेन्नीथाला बोलत होते. 

बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बँकेच्या कामकाजाबाबत प्रगतीबाबत सविस्तर माहीती दिली. यावेळी बोलतांना बँकेनी माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या नावाने सुरु केलेली राजीव गांधी स्वावलंबन कर्ज योजना व शेतकरी कल्याण निधी योजना बैंक राबवित असून राजीव गांधी स्वावलंबन कर्ज योजने अंतर्गत लहान व्यापा-यांना कोणतेही तारण न घेता बैंक कर्जवाटप करीत आहे. 

तसेच बँकेला मिळालेल्या नफ्यांमधून शेतकरी बांधवांच्या आरोग्यकरिता त्यांच्या दुर्धर आजारावर उपचार आणि औषधोपचाराकरीता बँकेने शेतकरी कल्याण निधी योजना राबवित आहे. हे दोन्हीही कार्य सामान्य सर्व सामान्य नागरीकांना डोळयासमोर ठेवून बँकेने उपक्रम हाती घेतला असून बँकेचे कार्य अतिशय जनतेच्या कल्याणासाठी प्रशंसनीय आहे. असे उद्गगार बोलून बँकेची व  बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि संचालक मडळाचे भरभरून कौतुक केले. तसेच बँकेच्या उत्तरोत्तर प्रगतीकरीता शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते श्री. विजयभाउ वडे‌ट्टीवार, विधिमंडळ गटनेते मां. बाळासाहेब थोरात, खासदार कीरणकुमार रेडडी, युवा नेते आमदार कुणाल चौधरी, आमदार कौरेती, काँग्रेस कमेटीचे सेकेटरी श्री.ओझाजी उपस्थित होते.

याप्रसंगी श्री.रमेश चेन्नीथाला यांचे बँकेचे अध्यक्ष श्री. संतोषसिंह रावत यांनी पुष्प गुच्छ, शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. बँकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे यांनी खासदार रेड्डी यांचा सत्कार केला. ज्येष्ठ संचालक संदीप गड्डमवार यांनी आमदार कुणाल चौधरी यांचा सत्कार केला. संचालक डॉ.विजय देवतळे यांनी विरोधी पक्ष नेते मां.विजय वडेट्टीवार यांचा सत्कार केला.तर संचालक शेखर धोटे यांनी विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.संचालक राजेश रघाताटे यांनीही  सरचिटणीस ओझाजी यांचा सत्कार केला. तसेच उपस्थित मान्यवरांचा बँकेच्या संचालकांचे शुभहस्ते शॉल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यांत आला. 

या कार्यक्रमा प्रसंगी बँकेचे  संचालक सर्वश्री  संजय तोटावार, संचालिका श्रीमती प्रभाताई द. वासाडे व श्री. राजेश्वर कल्याणकर मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागप्रमुख, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments