Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

डाॅ.संजय घाटे यांचे नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्र्यांना शेतकरी शेतमजुरासाठी विविध मागण्याचे निवेदन ; नरभक्षक व शेती पीकांचे नुकसान करणारे वन्य प्राणी यांचा बंदोबस्त करा ; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

डाॅ.संजय घाटे यांचे नेतृत्वात
राज्याचे मुख्यमंत्र्यांना शेतकरी शेतमजुरासाठी विविध मागण्याचे निवेदन

नरभक्षक व शेती पीकांचे नुकसान करणारे वन्य प्राणी यांचा बंदोबस्त करा ; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

चंद्रपुर जिल्ह्यात असलेल्या ताडोबा अभयारण्यात होत असलेली वन्य प्राण्यांची वाढ यामुळे गावा गावात वन्य प्राण्यांची  दहशत असल्याने ,शेतीचे हंगाम सुरू असताना जी मुठीत घेऊन जीवन जगावे लागते आहे आता पर्यंत  वाघानी व अन्य रानटी प्राण्यांनीं चंद्रपुर जिल्ह्यातील अनेक निष्पाप  लोकांचे अनेक  बळी घेतले आहे मात्र  शासनाकडून अल्पशे नुकसान भरपाई देवून त्यांचे तोंडाला पाने पुसण्याचे काम करीत आहे,चंद्रपुर   जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुर यांचे  जीवनमानात विपरीत परिणाम घडून येत असल्या कारणाने आज दि.9/9/2024 रोजी जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे मार्फतीने वन्य प्राणी त्याचे धोके  व मानवी जीवनावर होणारे गंभीर धोके लक्षात घेता  विविध मागण्या चे निवेदन बहूजन समता पर्व, भारतीय ओबीसी परिषद चंद्रपुर च्या  वतीने संघटनेचे अध्यक्ष डाॅ संजय घाटे यांचे नेतृत्वात निवेदन  देण्यात आले.
 
त्या प्रामुख्याने वन्य प्राण्याचे  हल्ल्यात मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचे कुटूंबास 1कोटी रूपये व शासकीय नोकरी देण्यात यावी ,व जखमीना 50लाख  रुपये ,वन्य प्राणी यांचे दहशतीमुळे जीवन जगत असलेल्या शेतकरी बांधवांचे शेती पीकांवर गंभीर परिणाम होत असल्याने प्रती एकर मोबदला 1लाख रूपये द्यावे,,दहशतीमुळे स्वतच्या शेती , घर गाव सोडून  बाजूच्या बाहेर राज्यात तेलंगणा, आंध्र प्रदेश येथे मजूरी साठी जाणारे शेतकरी, शेत मजूर यांना योग्य मानधन व रोजगार दयावा
शेतकरी ना लागवडीसाठी प्रती एकर 10हजार रूपये अनुदान दयावे, जिल्ह्यातील शेतकरी यांना ग्राम. पंचायत स्तरावर धान्य साठवनूकी साठी गोडावून उपलब्ध करून दयावा, जनावरे व मेंढी, बकरी पालना करीता चराई साठी जमीन उपलब्ध करून दयावी, अतिक्रमण धारकाना शेतीचे कायम स्वरूपी पट्टे देवून मालकी हक्क द्यावे, साप, विंचू चावलयाने मृत्यू झाल्यास मजूराना 50 लाख रूपये किचकट अटी शर्ती न ठेवता देण्यात यावे 
व वनातील प्राणी बाहेर शेतात जातात तेव्हा बाहेर जाऊ नये या साठी वनविभागाकडे काय नियोजन आहे ते जनतेत मांडले जावे इत्यादी मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री व वनविभागाकडे देण्यात आले  निवेदनावर चर्चा घडवून आणावी अन्यथा जिल्हात मोठे आंदोलन करण्या चा ईशारा ही दिला यात विजय जी नळे सचिव काॅगेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश तथा उपाध्यक्ष बहूजन समता पर्व, नंदू बारस्कर ,विकास ठाकरे, डाॅ. गजानन चौधरी माजी सरपंच चिमढा, सतिश चौधरी सरपंच टेकाडी, सुधीर गोवरधन सुरेशराव कावळे, योगेश निकोडे, प्रशांत ठाकरे, राहूल सोमलकर, रमेश नैताम, सचिन निंबाळकर, सहसचिव क्षत्रिय माळी समाज चंद्रपुर, बंटी  घाटे अध्यक्ष मेडिकल असोसिएशन जिल्हा चंद्रपुर, आशिष गौरकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments