Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन ; रेती तस्कर जोमात

मूल तालुक्यात रेतीचे अवैध उत्खनन ; रेती तस्कर जोमात

मूल प्रतिनिधी

तालुक्यातील हळदी, विरई, चितेगाव, मोरवाही, भादूर्णी आदी रेती घाटातून अवैद्य रेती उत्खनन होत असून स्थानिक प्रशासन मात्र चुप्प असल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

रेतीचे अवैद्य उत्खनन करणे यावर बंदी असून कोणत्याही प्रकारे अवैध्य उत्खनन केल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येते. परंतु तालुक्यातील हळदी, विरई नदी घाटातून गावालगतच असलेल्या ट्रॅक्टर चालकांनी काही रेती तस्करांना सोबत घेऊन उमा नदीतून मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन करून, साठवणूक करून विक्री करीत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रात्री होत असलेल्या अवैध वाहतुकीने आणि वाहनांचे आवाजाने स्थानिक नागरिकांना, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतकऱ्यांना कमालीचा त्रास होत आहे.

अवैद्य रेतीचे उत्खनन, वाहतुकीवर प्रतिबंध घालून रेती तस्करांवर कठोर कारवाई करावी अशी विनंती स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला केली आहे.

Post a Comment

0 Comments