Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

अ. भा. सफाई मजदूर स्वतंत्र कामगार संघटनेची मुख्याधिकारी यांच्याशी भेट

अ. भा. सफाई मजदूर स्वतंत्र कामगार संघटनेची मुख्याधिकारी यांच्याशी भेट

मूल प्रतिनिधी

 
अखिल भारतीय सफाई मजदूर स्वतंत्र कामगार संघटन महाराष्ट्र प्रदेश रजि.न.7262 इंडियन ट्रेड यूनियन एक्ट 1926 अंतर्गत सफाई कामगार संघटनेच्या वतीने दि.१७/०९/२०२४ मूल नगर परिषदेचे नवीन मुख्य अधिकारी श्री मा संदीप जी रोडे साहेब यांना संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व मुल तालुका शाखेचे तालुका अध्यक्ष श्री संदीप पारचे यांनी मुल नगर परिषदेतील नियमित व कंत्राटी सफाई कामगारांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात मुख्य अधिकारी साहेबांसोबत चर्चा केली, जसे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे लाभ तात्काळ देण्यात यावे, डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत ज्या सफाई कामगारांची सेवा पंचवीस वर्षे झालेली आहे अशा सफाई कामगारांना नगरपरिषदेच्या मालकीच्या हक्काच्या जागेवर घरे बांधून देण्यात यावे, नियमित सफाई कामगारांना शासकीय सुट्टी व त्याचा मोबदला रजा देण्यात यावा त्यांना नगर प्रशासन विभागाच्या जीआर नुसार महिन्यात दुसरा व चौथा शनिवार सुट्टी देण्यात यावी, नियमित व कंत्राटी, सफाई कामगारांची आरोग्य तपासणी  दर तीन महिन्याला घेण्यात यावी  त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे त्यांना साफसफाई चे साहित्य व सेफ्टी किट कंत्राट दाराकडून नियमित देण्यात यावे  ,दि.७/२/२०२४ ला नियोजन भवन चंद्रपूर येथे श्री मा डॉ पीपी वावा साहेब राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य न्यू दिल्ली केंद्रीय राज्यमंत्री दर्जा नियोजन भवन चंद्रपूर यांच्या बैठकीत मान जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या  निदर्शनात निघालेले मिनिट्स नुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय, निम शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था येथे कंत्राटी बाह्य स्त्रोत्वाद्वारे सफाई कर्मचारी घेंताना मेहतर, वाल्मिकी, भंगी, व डुमार , या जातीतील तसेच इतर समक्ष जातीतील बेरोजगार युवा- युवतीना प्राधान्य देऊन त्यांची नियुक्ती करण्यात यावी याच्यात मुल नगर परिषदेतील कंत्राटी, सफाई कामगारांमध्ये 8 लोकांना घेण्यात यावे , सफाई कामगारांचे प्रश्न तात्काळ सोडवण्यात यावे असे तालुका अध्यक्ष श्री संदीप पारचे यांनी मुख्याधिकारी साहेबाना सांगण्यात आले की कामगारांच्या  मागण्या मान्य न झाल्यास मूल  नगरपरिषद येथे सफाई कामगार संघटने कडून, काम बंद आंदोलन करण्यात येईल

Post a Comment

0 Comments