Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे वासवी श्री कन्याका परमेश्वरी देवस्थान प्राणप्रतिष्ठा सोहळा ; श्री स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांची उपस्थिती

मूल येथे वासवी श्री कन्याका परमेश्वरी देवस्थान प्राणप्रतिष्ठा सोहळा ; श्री स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांची उपस्थिती

मूल (अमित राऊत)

कला आणि परंपरा यांचा सुरेख संगम असलेला स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना— श्री कन्यका माता मंदिर मूल शहरातील मध्यवर्ती भागात आर्य वैश्य समाज ट्रस्टचे श्री कन्यका माता मंदिराचे लोकार्पण दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी होत आहे.  या लोकार्पण सोहळ्यास श्रीराम जन्मभूमी निर्माण समितीचे कोषाध्यक्ष पंडीत गिरीराज महाराज, वने व सांस्कृतीक कार्य तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रमुख उपस्थितीत धार्मिक विधीने या मंदिराचे लोकार्पण करण्यात येत आहे.

अयोध्देतील श्रीराम मंदिराचे प्राणप्रतिष्ठा करणारे पंडित गिरीराज यांचे शुभहस्ते, या मंदिरातील मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे, ही शहरवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. मूल शहरातील जुने आर्य वैश्य समाज महादेव मंदिराचे जिर्नोध्दार करून, या मंदिराची निर्मिती केली जात आहे.  नामवंत कलाकारांनी अत्यंत कुशलतेने कारीगीरी करीत अप्रतिम मंदिराचे कार्य केले आहे. पारंपारीक कोरीव नक्षीकामासोबतच आधुनिक स्थापत्यकलेचा नमुना असलेले हे मंदिर मूल शहराच्या वैभवात भर टाकणारे आहे.  या मंदिरात  श्री वासवी कन्यका मातेसह श्री गणेश, महादेव, हनुमान, नवग्रहासह एकूण 20 देव—देवतांच्या मुर्ती विराजमान असणार आहे.

दिनांक 14 ते 16 सप्टेंबर असे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता आर्य वैश्य मंदिरातून गांधी चौक, चंद्रपूर रोड मार्गे परत अशी भव्य कलशयात्रा निघणार आहे.  या कलशयात्रेत कलश घेतलेल्या शेकडो महिलांसह, भजन मंडळ, बॅंड पथक, पंडित गिरीराज महाराज यांची बग्गी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार— सौ. सपना मुनगंटीवार यांचा सहभाग राहणार आहे.  या कलशयात्रेत विविध झॉकी राहणार आहे.  दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत मंदिरातील मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून, त्यानंतर बाजार चौक मूल येथे पंडित गिरीराज महाराज यांचे प्रवचण आणि त्यानंतर महाप्रसाद असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे. आर्य वैश्य समाज ट्रस्टच्या वतीने मूल शहरातील नागरीकांना मोठ्या प्रमाणावर निमंत्रण दिले असून, भव्य—दिव्य कार्यक्रमासाठी मूल शहर सज्ज झाले आहे.  समाजातील कार्यकर्ते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी परि​श्रम घेत आहे.

Post a Comment

0 Comments