Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

हायवा वाहनामध्ये दबून कामगाराचा मृत्यू ; मरेगाव येथील विटाभट्टीतील घटना

हायवा वाहनामध्ये दबून कामगाराचा मृत्यू ; मरेगाव येथील विटाभट्टीतील घटना 

मूल प्रतिनिधी

हायवा वाहनामध्ये दबून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेचार वाजता च्या दरम्यान मरेगाव येथील विटाभट्टी परिसरात घडली. मृत कामगाराचे नाव सुरेश कावरू शिवणकर, वय साठ वर्ष, राहणार मरेगाव असे आहे. प्राप्त माहितीनुसार, राजोली मार्गावरील  मरेगाव येथे राखेपासून सिमेंट वीटा तयार करणारी  भट्टी आहे. त्या ठिकाणी सुरेश गौरव शिवणकर हे काम करीत होते. त्याच वेळेस विटाभट्टीच्या परिसरात ग्रेटा कंपनीतून राख घेऊन हायवा हे जड वाहण आले होते . राख  खाली झाल्यानंतर हायवा मागे घेत असताना हा अपघात झाला. त्यात सुरेश शिवणकर हे चाकाखाली सापडले. जखमी अवस्थेतील शिवणकर यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने उपचारांअंती त्यांचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी, मुल पोलिस पुढील तपास करीत आहे. वॄत्त लिही पर्यंत चालका विरुद्ध गुन्हा दाखल झालेला नव्हता.  ही विटा भट्टी चंद्रपूर येथील एका तंगडपल्लीवार  नामक व्यक्तीची असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments