Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राशन दुकानातून कुजलेले व खराब धान्याचे वाटप - कार्यवाही करण्याची ग्रा.प. सदस्याची मागणी Rotten and spoiled grain

राशन दुकानातून कुजलेले व खराब धान्याचे वाटप - कार्यवाही करण्याची ग्रा.प. सदस्याची मागणी

मूल (अमित राऊत)
मूल तालुक्यातील नवेगाव भुजला गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या कोरंबी गावात रास्त धान्य दुकान आहे. या धान्य दुकानातून नागरिकांना कुजलेले व खराब गहू, तांदूळ यांचे वाटप करण्यात आले. हे धान्य खाण्या योग्य नाही तरीही धान्याचे वाटप नागरिकांना दुकानदाराने केले. हे गाव पूरग्रस्त असून आगस्ट महिन्याचे धान्य खाण्याच्या स्थितीत नसून संपूर्ण खराब दिल्या गेले.

धान्य दुकानदार महिन्यातून एकदाच धान्य वाटप करतात त्याच दिवशी धान्य "नेले तर नेले नाही तर नका नेऊ" अशी धमकी नागरिकांना देत असल्याचे निवेदनात सांगितले आहे. तसे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे. याची चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी नवेगाव भुजल्याचे ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत किनेकर आणि गावकऱ्यांनी केली आहे.

निवेदन देताना पोलीस पाटील संदीप पोरटे, संतोष गेडाम, ओमदेव चांदेकर, अभिजीत नाहगमकर, दुर्गेश पोटे आदी नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments