Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

प्रियदर्शन मडावी सेट परीक्षा उत्तीर्ण, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव

प्रियदर्शन मडावी सेट परीक्षा उत्तीर्ण, सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव 


युजीसी दिल्ली व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे द्वारा 7 एप्रिल 2024 रोजी आयोजित सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा सेट चा निकाल 5 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर करण्यात आला.या परीक्षेत जि प उच्च प्राथ.शाळा पेंढरीमक्ता ता सावली येथील विषय शिक्षक पदावर कार्यरत असलेले श्री, प्रियदर्शन मोरेश्वरजी मडावी हे समाजशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.या पूर्वीही त्यांनी मराठी विषयात नेट व सेट परीक्षा उत्तीर्ण केली असून, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत घेण्यात आलेल्या मराठी व समाजशास्त्र विषयातील पीएचडी (आचार्य)पात्रता परीक्षा पेट उत्तीर्ण झाले असून,त्यांची मराठी विषयात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे पीएचडी सुरू आहे.प्रियदर्शन मडावी हे मूळचे मूल तालुक्यातही गोवर्धन येथील रहिवासी असून ते सामाजिक व शैक्षणिक चळवळीत नेहमी अग्रेसर असतात,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तथा सामाजिक प्रबोधनाचे कार्य करतात,ते उत्तम वक्ते व मार्गदर्शक आहेत.प्राथमिक शिक्षकाने सेट परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे,त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments