Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शहर उपजीविका केंद्राचे उद्घाटन संपन्न

मूल शहर उपजीविका केंद्राचे उद्घाटन संपन्न

मूल प्रतिनीधी
 
दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत परिवर्तन शहर संघा द्वारे मुल शहर उपजीविका केंद्राचे उद्घाटन सोहळा सकाळी बारा वाजता करण्यात आला. हा उद्घाटन सोहळा सुवर्ण जयंती हॉलमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शहराच्या मृदुला मोरे तहसीलदारमुल  तसेच उद्घाटक यशवंत पवार नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी नगरपरिषद मुल यांच्या उपस्थित पार पडला. 

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्रीकांत समर्थ पाणीपुरवठा विभाग, पंकज आसेकर कर निरीक्षक, अभय चेपुरवार आरोग्य विभाग, रितेश भोयर सहाय्यक प्रकल्प अधिकारी, आलेख बारापात्रे शहर समन्वय , हरीश कुमरे संघनक अभियंता उपस्थित होते. उपजीविका  केंदाचा मुख्य उद्देश शहरी गरीब उत्पादक व ग्राहक यांची सांगड घालणे व शहरी गरिबांना माहिती आणि व्यवसायासाठी आवश्यक ते सहाय्य करणे, उपजीवीका केंद्र हे शहरी गरीब उत्पादक व ग्राहक यांना जोडणारा दुवा असेल तसेच वस्तू व सेवा यांची मागणी व पुरवठा जोडण्याची काम करेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदाताई चल्लावार शहर संघ अध्यक्षा यांनी केले संचालन नलिनी आडपवार संयोगिनी यांनी केले. आभार प्रदर्शन  सहसचिव चित्रा गुरनुले यांनी केले. या उद्घाटन प्रसंगी बचत गटातील भरपूर महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल फुले, आशा येरणे, संजना मडावी ,प्रिया सुरपाम, योगिता मारकवार यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments