Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

मूल (अमित राऊत)

मूल येथिल बल्लारपूर पब्लिक स्कूल येथे मोठ्या उत्साहात 78 स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ मूल चे ऍड. अनिल वैरागडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. तसेच मुख्य अतिथी म्हणून धर्माधिकारी सचिव शिक्षण प्रसारक मंडळ मूल, विशेष अतिथी म्हणून कापगते सर माजी प्राचार्य कर्मवीर महाविद्यालय मुल, शाळेचे प्राचार्य विनोद बोलीवार तसेच विद्यार्थी प्रतिनिधी कुमार अंश तेलसे विद्यार्थिनी प्रतिनिधी कशिश रामटेके कार्यक्रमात उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण कुमारी दुर्गा कोडगले शैक्षणिक प्रभारी बल्लारपूर पब्लिक स्कूल मूल तसेच शाळेचे प्राचार्य विनोद सर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना स्वातंत्र्यदिनानिमित्त मार्गदर्शन करून स्वातंत्र दिनाचे महत्त्व पटवून दिले तसेच सर्व उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व स्पर्धेमध्ये प्रवीण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध प्रकारचे नृत्य सादर करून पालकाना व उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. 

हस्ताक्षर स्पर्धा,वकृत्व स्पर्धा प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तोशी जयस्वाल कु सिमरन सिडाम वर्ग 10 वा व निशांत भेंडारे वर्ग 10 वा तसेच कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शन कुमार नैतिक चीटमलवार वर्ग 9 वा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी अथक परिश्रम घेतले खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या राष्ट्रागानाने झाली.

Post a Comment

0 Comments