Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

लुटमार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल, नागाडा फाट्या जवळील घटना

लुटमार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल, नागाडा फाट्या जवळील घटना 

मूल प्रतिनिधी

गाडी अडवून दुकानदारास मारहाण करून जबरी चोरी करणारे आरोपीवर मुल पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. पंकज सुरेश जुमडे असे फिर्यादीचे नाव असून, त्याचे जवळून आरोपीने 90 हजाराची चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपीत निरज प्रसाद रायपुरे वय ३८ वर्षे, रा.वार्ड क.१७ मूलतोहित आरीफ शेख वय 24 वर्षे, रा.वार्ड क्र.17 मुल, सचिन श्रीराम लाकडे वय 37 वर्षे रा.वार्ड क्र.12 मुलशोएब वाजीदखान पठाण वय २८ वर्षे रा.वार्ड क. 11 मुलं
(5) गणेश मनोहर चव्हाण वय 29 वर्षे रा.वार्ड क्र..12 मुल फरार आरोपी, नौशाद पठाण रा. मुल या.मुल जि. चंद्रपूरआकाश राम रा.मुल ता.मुल जि. चंद्रपूर यांचा समावेश आहे.
ही घटना 04/08/2024 चे 22.15 वा दरम्यान घडली. या घटनेची तक्रार दिनांक.06/08/2024 रोजी मूल ल पोलीस स्टेशनला दिल्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले
ही घटना.मौजा मुल ते चंद्रपुर मेन रोड नागाळा फाट्याजवळ घडली.
मुल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचे मुल येथे किराणा दुकान असून तो किराणा दुकान चे सामान आणणे कामे कागजनगर (तेलंगणा) येथे सामान स्वस्त मिळत असल्याने गेला होता. परंतु सदर दुकान बंद असल्याने तो सामान न घेता परत चंद्रपूर मार्गे मुलकडे स्विफ्ट गाडीने येत असतांना नमुद घटना ता. वेळी व ठिकाणी यातील आरोपीतांनी त्यांचे मागुन येवुन आपली अर्टीगा गाडी फिर्यादीचे गाडी समोर लावुन फिर्यादीची गाडी थांबवुन गाडीतील फिर्यादीस लोखंडी टॉमीने व इतर दोघांना लाताबुक्यांनी मारहाण करून जखमी केले व त्यांचेजवळील नगदी 70,000/- रू. व दोन मोबाईल किंमत प्रत्येकी 10,000/- रु. प्रमाणे 20,000/-रू असा एकुण 90,000/- रु.चा माल लुटमार करून घेवुन गेले असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून व मेडीकल रिपोर्टवरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
         सदर गुन्हयाचा पुढील तपास  पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर , अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी सा.मुल, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांचे मार्गदर्शनात पुढील तपास सपोनी अविनाश मेश्राम, स.फौज उत्तम कुमरे,पोहवा भोजराज मुंडरे,सचिन सायंकार,ना.पो.अ चिमाजी देवकते, पो.अ शफिक शेख हे करीत असून सदर गुन्ह्यातील अनु क्र 01 ते 05 आरोपीत्यांचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्यात आले असून सदर आरोपीत्यांचा दोन दिवसाचे p.c.r घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे फरार दोन आरोतानाअटक करण्याकरिता टीम रवाना करण्यात आले आहेत  आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिताचे कलम ३११ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे. 

Post a Comment

0 Comments