Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

डोंगरगाव येथे श्री गुरुदेव क्रांतिज्योत यात्रेचे जोरदार स्वागत

डोंगरगाव येथे श्री गुरुदेव क्रांतिज्योत यात्रेचे जोरदार स्वागत

मूल प्रतिनिधी
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम द्वारा क्रांतिज्योत यात्रेचे मौजा डोंगरगाव येथे आगमन दि.२८ आगष्ट ला झाले..यावेळी गुरुदेव सेवा मंडळ डोंगरगाव च्या वतीने पालखी व राष्ट्रसंतांच्या चरणपादुकांसह गावातून मिरवनुक काढत जोरदार स्वागत करन्यात आले.

यात्रेसोबत गुरुकुंज आश्रमांचे प्रमुख प्रकाश महाराज वाघ, यात्रेचे प्रमुख सुशील बुरडे, आश्रमातील पालखी पुजारी एकनाथ गायत्रे, चन्द्रपुर जिल्हा प्रमुख प्रा.अशोक चरडे, शरद सहारे महाराज ईत्यादि ऊपस्थीत राहुन मार्गदर्शन केले.
क्रांतिज्योत यात्रेची सुरवात गुरुकुंज आश्रमातुन ९ आगष्टपासुन झाली असुन ३१ आगष्ट पर्यंत चालणार आहे.

यात्रेच्या स्वागताकरीता डोंगरगावचे माजी सरपंच मुकेश गेडाम, कवडु मडावी, विठ्ठल मडावी, खुशाल मसराम, मधुकर मुंगमोडे, पुरुषोत्तम संतोषवार, अशोक शेंडे, रत्नाकर शेन्डे, पत्रुजी गेडाम, सोमेश मसराम, ज्ञानेश आळे तथा सर्व गुरुदेव सेवा मंडळ डोंगरगावचे कार्यकर्ते, पुरुष, महीला तथा बालगोपाल मोठ्या संख्येने ऊपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments