Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

प्रा.निलेश नैताम यांचा सेट परीक्षा उत्तीर्ण अभिनंदन सोहळा ; सुरवी महिला महाविद्यालयाचा उपक्रम

प्रा.निलेश नैताम यांचा सेट परीक्षा उत्तीर्ण अभिनंदन सोहळा ; सुरवी महिला महाविद्यालयाचा उपक्रम

मूल प्रतिनिधी

सावित्रीबाई फूले विद्यापीठ पुणे द्वारा ७ एप्रिल २०२४ रोजी आयोजीत सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा सेट चा निकाल ५ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत शूरवी महिला महाविद्यालयमध्ये कार्यरत सहाय्यक प्रा. निलेश नैताम यांनी इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्याचे औचित्य साधून शूरवी महिला महविद्यालयाचे वतीने अभिनंदन सोहळा घेण्यात आला.

महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या हर्षा खरासे , सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच श्री माता कन्यका सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. कापर्ती सर , संस्थेचे सचिव मा. सुरावार सर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments