Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शूरवी महिला महाविद्यालया ने केले सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

शूरवी महिला महाविद्यालया ने केले सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन

मूल प्रतिनीधी

शूरवी महीला महाविद्यालय मुल येथे मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री, वने, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय म.रा.तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महाविद्यायलयात वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच विद्यार्थीनींना गणवेश व छत्रीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.डॉ. इंगोले सर यांनी आपल्या मार्गदर्शनात सुधीरभाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकले. त्याच प्रमाणे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. माता कन्यका सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. कापर्ती सर यांच्या उपस्थितीत तसेच संस्थेचे सचिव मा.श्री. राजेश सुरावार सर यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांना सक्षम व स्वावलंबी बनवित असल्याचे प्रयत्न करीत आहो असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या हर्षा खरासे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे कोषाध्यक्ष मा.अनिल दंडमवार तसेच संस्थेचे सदस्य मा. सिंघवी सर तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. जिवनभाऊ कोंतमवार यांनी आपले विचार व्यक्त केले.

आ.ना. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शूरवी महिला महाविद्यालय परिसरात  प्रमुख अतिथिंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपणाने आरोग्य व पर्यावरण संतुलित राहणार आहे. खरे तर झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यच मानले पाहिजे. त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकाचा मनापासून सहभाग आवश्यक आहे.असे मत अतिथिंनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. वैष्णवी चिंतावार यांनी केले. तर आभार प्रा. सहारे सर यांनी मानले. कार्यक्रमाला  मोठ्या संख्येने विद्यार्थीनींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी  यांनी मोलाचे सहकार्य केले.

उपजिल्हा रुग्णालय मुल येथे रूग्णांना फळे, ब्लॅकेट व छत्री चे वितरण

उपजिल्हा रुग्णालय मुल येथे ना. सुधीरभाऊंच्या हस्ते रुग्णांना फळे, ब्लॅकेट व छत्रीचे वितरण करण्यात आले. शूरवी महिला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या हर्षा खरासे यांनी अभिष्ठचिंतन करून संस्थेच्या वतीने सुधिरभाऊंना शुभेच्छा दिल्या. श्री.माता कन्यका सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. कापर्ती सर संस्थचे सचिव मा. सुरावार सर, कोष्याध्यक्ष मा.दंडमवार सर, सदस्य मा.सिंघवी सर तसेच एस.एन.डी.टी. विद्यापीठाचे चे संचालक मा. डॉ. इंगोले सर त्याच प्रमाणे प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थीनींनी केक कापून सुधीरभाऊंना दिर्घयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments