Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

रोहित शास्त्रकार यांना पालकमंत्र्याच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त

रोहित शास्त्रकार यांना पालकमंत्र्याच्या हस्ते जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त

मूल (अमित राऊत)

मूल तहसील कार्यालयातील अव्वल कारकून पदावर कार्यरत रोहित शास्त्रकार यांना तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. मूल तालुक्यात नैसर्गिक आपत्ती, कोतवाल भरती, मराठा आरक्षण, शासकीय वसुली आदी उत्कृष्ट कामाबाबत पुरस्कार देण्यात आला.

जिल्हास्तरीय पुरस्कार स्वातंत्र्य दिनी चंद्रपूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी विवेक जॉन्सन आदी अधिकारी उपस्थित होते. 

रोहित शास्त्रकार यांचे मूल तहसीलचे उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, मूल तहसीलचे तहसीलदार मृदुला मोरे यांनी अभिनंदन केले असून सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments