Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

काटवण येथील मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर ; भूमिपुत्र ब्रिगेडने प्रशासनाला अनर्थ टाळण्याचा दिला इशारा

काटवण येथील मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर ; भूमिपुत्र ब्रिगेडने प्रशासनाला अनर्थ टाळण्याचा दिला इशारा 

मूल (अमित राऊत)


 
मूल तालुक्यातील काटवन येथील मामा तलाव फुटण्याच्या मार्गावर असल्याची माहिती भूमिपुत्र ब्रिगेडच्या टीमला कळली. माहिती होताच टीमने भेट देऊन प्रशासनाला अनर्थ टाळण्याकरिता त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. मामा तलावांच्या देखरेखीचे काम योग्य प्रकारे न केल्यामुळे जिल्ह्यातील कित्येक गावचे तलाव फुटले आहे. 

चिचपल्ली दाबगाव मक्ता येथील तलाव फुटून शेतीचे आणि लोकांच्या वस्तीचे प्रचंड नुकसान झाल्याचा उदाहरण त्यांनी प्रशासनाला दिला. काटवण येथील तलावाच्या पाळीला सुद्धा मोठे भगदाड पडलेले आहे. तलाव फुटला तर परिसरातील संपूर्ण शेतीचे आणि वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. प्रशासनाने त्वरित कारवाई करावी असा इशारा भूमिपुत्र ब्रिगेडच्या टीमने प्रशासनाला दिलेला आहे. 

या घटनेमुळे मामा तलावांच्या देखरेखितेतील भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे. मुसळधार पाऊस आला, पूर आला की मामा तलावांची पार फुटते आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना भोगावा लागतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी भूमिपुत्र ब्रिगेडने केली आहे.

Post a Comment

0 Comments