Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृहात जागतिक आदिवासी दिन साजरा

आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृहात जागतिक आदिवासी दिन साजरा 

मूल प्रतिनिधी

मूल शहरातील आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृहात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्तीगृहाचे गृहपाल प्रशांत फरकाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद विद्यालयातील शिक्षक शंकर डडमल, गेडेकर साहेब, पत्रकार अमित राऊत, कृषी उत्पन्न बाजार समिती मूल चे कर्मचारी राजू गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यारपण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले.

कार्यक्रमात संबोधितांना शंकर डडमल यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या नृत्य व भाषणाचे कौतुक केले. उच्च शिक्षण घेऊन स्वतःची व आपल्या परिवाराची प्रगती साधावी असे मार्गदर्शन केले. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांचा संघर्ष लक्षात ठेवून शिक्षणाला अधिक महत्त्व द्यावे असे प्रतिपादन आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अमित राऊत यांनी केले. आर्थिक आणि सामाजिक समानता समाजामध्ये यावी याकरिता डॉक्टर बाबासाहेबांचा व्यापक दृष्टिकोन गेडेकर साहेब यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. विविध स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा असे प्रतिपादन राजू गेडाम यांनी केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप पारचे, संचालन आदित्य गेडाम तर आभार प्रदर्शन गुरुदेव आसोले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभम गावतुरे, राहुल गेडाम आणि आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments