Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

डोंगरगावात मंडल यात्रेचे उत्साहात स्वागत, ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद

डोंगरगावात मंडल यात्रेचे उत्साहात स्वागत, ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद 

मूल डोंगरगाव (विनोद ठाकरे)

ओ. बि. सी. चे प्रश्न घेऊन नागपुर वरून निघालेली मंडल यात्रा मूल तालुक्यातील डोंगरगावयेथे पोहचली. यात्रा डोंगरगाव इथे पोहचताच ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतीषबाजीने जोरदार स्वागत करण्यात आले. या यात्रेचे मुख्य संयोजक उमेश कोराम, डॉ घाटे ,  मालेकर  यांच्या नेतृत्वाखाली हि यात्रा आली.  

गावातील सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन गावातील यात्रेला सुरुवात झाली. प्रतीष्ठीत नागरिकांच्या वतीने आलेल्या पाहुण्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. मनोगत व्यक्त कोराम यांनी ओ. बि. सी नी एकजुटीने आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा असे सांगितले. तर  डॉ घाटे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की.्२४ तारखेला होणारी महा सभेला जास्तीत जास्त संख्येने  उपस्थित व्हावे. 

या यात्रेला गावातील गुलाब शेन्डे  मधुकर पा. मुंगमोडे  बंडू मांदाळे , सुधीर शेन्डे , यशवंत देवगिरकर, विनोद ठाकरे, गिरीधर मस्के, भाग्यवान मोहुर्ल, गणेश वासेकर, गंगाधर पा मुंगमोडे, विनोद शेन्डे, यशवंत बहिरवार, एकनाथ शेन्डे, वलके,  कावळे, रमेश थेरकर, ममताताई सोनुले, वंदना ताई मोहुर्ल,  तसेच इतर नागरीक विनोद ठाकरे यांनी आभार प्रदर्शन करुन डोंगरगाव येथील कार्यक्रम ाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments