Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विद्यार्थिनींनी घेतले कौशल्याचे धडे, कौशल्य व डिजिटल उपक्रम Students took skill development lessons

विद्यार्थिनींनी घेतले कौशल्याचे धडे, कौशल्य व डिजिटल उपक्रम

मूल प्रतिनिधी

केंद्र शासन निर्देशानुसार नवभारत कन्या विद्यालय मुल येथे शिक्षण सप्ता उपक्रमांतर्गत कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना क्षमता व कौशल्याचा मेळ साधून सक्षम बनविणे या उद्देशाने विद्यालयात व्याख्यान मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अल्का राजमलवार उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून सक्सेस कम्प्युटर मुलचे संचालक नितीन येरोजगार यांनी रोबोटिक आणि ए आय या आधुनिक प्रणालीवर मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या आकनुरवार मॅडम यांनी सुद्धा अन्न विज्ञान, गृह विज्ञान व सौंदर्य विषयक मार्गदर्शन केले उद्योग क्षेत्रामध्ये कौशल्य आणि डिजिटल प्रणालीचा कशाप्रकारे उपयोग होऊ शकतो यावर पालक म्हणून उपस्थित असलेले गोपाल बल्लावार, भांदक्कर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला वर्ग 8 ते 10 चे विद्यार्थिनी, पालक तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यालयातील विद्यार्थिनींनी कार्यक्रमातून नवनवीन कौशल्याचा बोध घेतला. प्रश्नांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी अडचणीला कशी मात देता येईल हे सुद्धा जाणून घेतले. कार्यक्रमाची प्रास्ताविक विद्यालयातील शिक्षक संतोष गवारकर यांनी केले तसेच संचालन वर्ग दहावीची विद्यार्थिनी श्रेयशी बल्लावार तर आभार प्रदर्शन वर्ग दहावीची विद्यार्थिनी कुमारी सेजल भांदक्कर यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यामागे वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांचे योगदान आहे.

Post a Comment

0 Comments