Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

शिक्षण सप्ताह उत्साहात, चांदापूर हेटी येथे विविध उपक्रमांनी साजरा

शिक्षण सप्ताह उत्साहात, चांदापूर हेटी येथे विविध उपक्रमांनी साजरा

मूल (अमित राऊत)


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांदापूर हेटी येथे दिनांक २२ जुलै २०२४ पासून शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .
पहिल्या दिवशी शैक्षणिक साहित्य निर्मिती व प्रदर्शनी घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान दिवस साजरा करण्यात आला यामध्ये जादुई पेटाऱ्यातील शैक्षणिक साहित्यांची प्रदर्शनी भरविण्यात आली . तिसऱ्या दिवशी क्रीडा दिवस साजरा करण्यात आला यामध्ये फुगडी , कबड्डी, लगोरी, आंधळी कोशिंबीर हे देशी खेळ तर सापशिडी, लुडो हे इनडोअर खेळ घेण्यात आले . चौथ्या दिवशी सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला यामध्ये गावातील दंडार , भजन व नाटय कलाकारांना शाळेत बोलावून त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची वैयक्तिक नक्कल , वैयक्तिक गायन, सामुहिक नृत्य , वैयक्तिक नृत्य व वेशभूषा उपक्रम घेण्यात आला . पाचव्या दिवशी कौशल्य व डिजीटल दिवस साजरा करण्यात आला . यामध्ये विद्यार्थांच्या कला कौशल्याला व गावातील कुशल कामगार यांची मदत घेऊन मातकाम, बागकाम व इतर धंदे विषयी माहिती जाणून घेतली व डिजीटल वस्तूंची ओळख व हताळणी घेण्यात आली . सहावा दिवस इको क्लब साजरा करण्यात आला व विविध झाडांची लागवड करून झाडांना मुनांचे नाव देण्यात आले . शेवटचा दिवस शैक्षणिक उत्कृष्ठतेचा उत्सव ( विघ्यांजली ) उपक्रम साजरा करण्यात आला व स्वयंसेवक नियुक्त करून त्यांच्याकडून विद्यांजली लोगो तयार करण्यात आले . व पालकांना आमंत्रित करून तिथी भोजन समूह भोजन करण्यात आले .
या सात दिवशीय उपक्रमासाठी मुख्याध्यापक दिलीप भुरसे व सहाय्यक शिक्षक नंदकिशोर शेरकी यांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments