Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कुत्र्यांनी केले चितळाला जखमी, मूल शहरांतील घटना

कुत्र्यांनी केले चितळाला जखमी


मूल शहरांतील कालेज ग्राउंड वर आज सकाळी व्यायाम करणा-या काही मुलांना रेल्वे क्वाटर जवळ एका नर चितळाच्या मागे काही कुत्रे लागले होते. कुत्र्यांनी चितळाला कीरकोळ जखमी केले असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती त्यांनी वनविभाग व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्यांना दीली. वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली (प्रादेशिक) प्रिंयका वेलमे मॅडम यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक, संस्थेचे सदस्य व कालेज ग्राउंड वरील तरूणांनी अथक परिश्रमाने चितळाला पकडले डाक्टर संदिप छौनकर यांनी जखमी चितळावर प्राथमिक उपचार केले व त्याला सुरक्षित पणे जंगलात सोडण्यात आले.

यावेळी वनरक्षक सूधिर ठाकुर, संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार, स्वप्नील आक्केवार, अंकुश वाणी, प्रतीक लेनगुरे, विशाल टेकाम, सोनु नागोशे,रंजन गोटेफोडे, विशाल मडावी,बादल नागोशे, आदित्य गंगेवार, रोहित तांगडे,सुरज मडावी,चिकु निकोडे, प्रफुल कोल्हे,खुशी तांगडे,श्रध्दा शेंडे,अंजली शेंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments