Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कार च्या धडकेत सांबराचा मृत्यू, रस्ता ओलांडताना झाला अपघात

मूल प्रतिनिधी
 

कार च्या धडकेत सांबर चा मृत्यू
चंद्रपूर मार्गावर मूल पासून अवघ्या तीन कीलोमीटर अंतरावर चंद्रपूर ला जाना-या एका कार वर उडी मारली. ही घटना रस्ता ओलांडताना घडली. सांबर कारच्या सामोरील काचेवर धडकला. या अपघातात सांबर गंभीर जखमी झाला. कारचे पण भरपूर नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच एफ डी सी एम चिचपल्ली चे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.बोथे यांचे मार्गदर्शनात वन कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य घटनास्थळी उपस्थित होते. गंभीर जखमी सांबराला मूल येथे उपचारासाठी वाहनात आनतांना मृत्यू झाला.

अपघातात मृत झालेले सांबर मादि असुन वय जवळपास दोन वर्ष होते. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ संदिप छौनकर यांनी मृत सांबराचे शवविच्छेदन केले. नंतर दहण करण्यात आले. या सर्व कार्यवाही दरम्यान एफ डी सी एम चे क्षेत्र सहाय्यक आर.जी.कुमरे, वनरक्षक यु.आर.गवई, प्रादेशिक चे वनरक्षक सूधिर ठाकुर संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, प्रशांत मुत्यारपवार, स्वप्नील आक्केवार, प्रभाकर धोटे, दिनेश खेवले, विशाल टेकाम, संदिप सोयाम, आदित्य दहिवले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments