Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

किरकोळ दारू विक्रेत्यांना पकडले; पुरवठादार मोकाट? अवैद्य दारू विक्रीने वैद्य दारू विक्रीवर परिणाम? ना. मुनगंटीवार यांनी केली होती दारूबंदी तर ना.वडेट्टीवार यांनी उठवली दारूबंदी

किरकोळ दारू विक्रेत्यांना पकडले; पुरवठादार मोकाट?

अवैद्य दारू विक्रीने वैद्य दारू विक्रीवर परिणाम?

ना. मुनगंटीवार यांनी केली होती दारूबंदी तर ना.वडेट्टीवार यांनी उठवली दारूबंदी 

मूल प्रतिनिधी
 

1 एप्रिल 2015 रोजी दारूबंदी लागू झाली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी दारूबंदीची मागणी केल्याने नामदार सुधीर मुनगंटीवार सत्तेत आल्यावर चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी लागू केली. मात्र अवैध दारू आजूबाजूच्या जिल्ह्यातून येत असल्याने जिल्ह्यात जागोजागी अवैध दारू मिळायची. त्यामुळे सर्वत्र अवैध दारूचा हाहाकार माजला होता. त्यामुळे पाच वर्षातच दारूबंदी उठविण्याची मागणी झाली. त्यानंतर नामदार वडेट्टीवार सत्तेत आल्याने चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविली. चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी पाच वर्षे राहिली. 2021 नंतर दारूबंदी उठविल्या गेली. दारूबंदी उठविल्यानंतर आज चार वर्षे होत आहे. मात्र आजही अनेक ठिकाणी अवैध दारू विक्री केल्या जाते. दारूबंदी असतानाही अवैध दारू विक्री व्हायची. आता दारूबंदी उठविली असतानाही अवैध दारू विक्री होतच आहे. 

दारूबंदी असतानाही विविध ठिकाणी वेगवेगळ्या दुकानात, वेगवेगळी सकल लढवून अवैध दारू विक्री केल्या जात होती. आताही विविध दुकानात, विविध पान ठेल्यावर, वेगवेगळ्या पद्धतीने अवैध दारू विक्री होत आहे आणि त्यातून मध्यप्रेमी आपली शोक भागवीत आहे. आजही पोलीस अवैध दारू विक्री करणाऱ्यांना पकडतात. त्यांच्यावर गुन्हे दाखलही होत आहे. बऱ्याचदा किरकोळ दारू विक्रेत्यावर धाड टाकून गुन्हे दाखल केल्या जातात परंतु जिथे जिथे किरकोळ दारू विक्री केल्या जाते मात्र दारू पुरवठा करणाऱ्यांना कधी पकडणार? त्यांना का पकडल्या जात नाही? असे विविध प्रश्न नागरिक करीत आहे. किरकोळ किंवा चिल्लर दारू विक्रेत्यांना वेगळा न्याय आणि ठोक दारू विक्रेते किंवा पुरवठा करणाऱ्यांना वेगळ्या न्याय प्रशासन करते काय? अशी चर्चा नागरिकांत होत आहे. 

चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविल्यानंतर जिल्ह्यात वाईन शॉप बिअर बार, दारूभट्टी सुरू झाली. तरी अवैध दारू विक्री होत असल्याने त्याचा परिणाम वैद्य दारू विक्रीवर होत असल्याचे समजते. अवैध दारू विक्री होऊ नये असे वैद्य किंवा लायसन दुकानदारांना वाटत असते. मात्र अवैध दारू पुरवठा करणारे कोण? ज्यांच्याकडे दारूची लायसन आहे, जे वैद्यपणे दारू विक्री करून पैसा कमवू शकतात. तेही जादा पैसा मिळावा म्हणून अवैध दारू विक्री करतात. 

दारूबंदी उठविल्यानंतर बिअर शॉपी ची ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. बिअर शॉपी मधून बियर घेऊन जाता येते मात्र तिथेच पिण्याची मुभा नसतानाही नियम धाब्यावर बसवून तिथेच बियर पिल्या जाते, असे अनेक बिअर शॉपी ची परिस्थिती आढळून येते.याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते. काही दिवसाआधी मुल येथील एका बियर शॉपी चा व्हिडिओ ही व्हायरल झाल्याची चर्चा मूल शहरात होती.  अनेक ठिकाणी तर राहणाऱ्या वस्तीत घराला लागूनच बियर शॉपी उघडल्या गेली आहे. अनेक नागरिकांनी विरोधही केला मात्र त्याचा काही परिणाम झालेला दिसून आला नाही. कायदे-कानून न्याय सर्वांना सारखाच असावा अशी अपेक्षा नागरिक करीत आहे.

Post a Comment

0 Comments