Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

तालुका कृषी अधिका-यांविरूदध निलंबनाची कारवाई करा ; राष्ट्रीय लोकहित सेवाचे निवेदन

तालुका कृषी अधिका-यांविरूदध निलंबनाची कारवाई करा ;
राष्ट्रीय लोकहित सेवाचे निवेदन

मूल प्रतिनिधी :-


विनयभंगाच्या जाळयात अडकलेले येथील तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांच्या विरूदध प्रशासनाने निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रीय लोकहित सेवाच्या वतीने करण्यात करण्यात आली आहे. मूल येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील महिला कर्मचा-याने प्रशांत कासराळे यांच्या विरूदध मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.तक्रारीच्या आधारे येथे विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र,जिल्हा कृषी विभागाने त्यांच्याविरूदध कोणतीही पुढील कारवाई केली नाही. त्यामुळे सदर महिले मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मानसिक दडपणाखाली तीला कार्यालयात काम करावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तालुका कृषी अधिका-यांविरूदध उच्च स्तरीय चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी.तसेच मूल येथून हकालपटटी करावी अशी मागणी राष्ट्रीय लोकहीत सेवाचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी केली आहे.याबाबत तालुका आणि जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.तहसिदार यांच्याकडे निवेदन सादर करताना औद्योगिक सेलच्या जिल्हा सचिव समता बन्सोड,महिला कार्यकर्त्या सविता मारटकर, कविता दिकांडवार,अर्चना ठाकरे,पुंडलिक गोठे ,विक्रम गुरनूले,ओमदेव मोहूर्ले तसेच कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments