Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

पिकविम्याच लाभ शेतकरयांना तात्काळ द्या.! घरकुल धारकांना वाळू उपलब्ध करून द्या...!शिवसेना उ.बा.ठा.ची मागणी

पिकविम्याच लाभ शेतकरयांना तात्काळ द्या.! 
घरकुल धारकांना वाळू उपलब्ध करून द्या...!शिवसेना उ.बा.ठा.ची मागणी

मूल प्रतिनिधी

पिकविम्याचा लाभ अजूनही शेतकऱ्याना मिळाला नसून शेतकरी हवालदिल झाला आहे,तर दुसरी कडे घरकुल मिळाले पण वाळू उपलब्ध नाही म्हणून गोरगरीब उघड्यावर आहेत.आणि शासन प्रशासन मात्र सुस्त आहे.करिता शेतकरी आणि घरकुल धारकांना न्याय मिळवून देण्याकरिता दीं.७.६.२३ रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गीऱ्हे यांचे नेतृत्वात शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांनी शिवसेनेचे शिस्ट मंडळ घेऊन मुल तहसीलदार यांना भेटून निवेदन दिले.
 राज्यभरात झालेल्या अवकाळी पावसाने तसेच सततचा दुश्काळी परिस्थीतीने शेतमालाला मोठयाप्रमाणात फटका बसला. शेतमालाला फटका म्हणजे शेतकऱ्याचे नुकसान झाल्या मुळे राज्य शासनाने सोयाबीन,कापूस,कडधान्य आदी पीकांना अवकाळी पावसाच्या फटक्याबाबत माहिती घेण्यासाठी महसुल आणि इतर संबधित विभागानां आदेष दिले शासन आदेषान्वेयेेे यंत्रणा कामाला लागली. नुकसानग्रस्त भागात मौका चौकषी करून नुकसानीचा अहवाल बनविला गेला आहे. मात्र यात धान पीक सोडल्याने धानपीक उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.अवकाळी पावसाचा फटका धान पीकालाही बसला आहे त्यामूळे काही भागात तर कापणी झाली असतांना  बांधण्यापुर्वी धान शेतातच ओला होऊन सडुन गेला. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दुर्लक्षितपणामुळे शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. शासनाकडुन तातडीने शेतकर्यांना पिकविम्याचा लाभ मिळणे आवष्यक असल्याने आपल्यास्तरावरून कार्यवाही करण्यात यावी.
       त्याचप्रमाणे गरीब गरजु लोकांना शासनाने घरकुल मंजुर केले मात्र शासनाच्या चुकीचा धोरणाुमुळे घरकुल लाभार्थ्यांना वाळु मिळत नसल्याने त्यांनी घरांचे बांधकाम कसे करावे संसार उघड्यावर पडला असून घरे कसे बांधावे असा प्रश्न निर्माण झालं आहे त्यामुळे आपण याबाबत ताताडीने आदेष करून घरकुल लाभार्थ्यांना वाळु लवकरात लवकर उपलब्ध करून दयावी.अन्यथा शीवसेना रस्त्यावर उतरून मोठया स्वरूपाचे आंदोलन करेल.असे यावेळी शिवसेना पदाधिकारी यांनी सांगितले.यावेळी शिवसेना शहर प्रमुख आकाश राम,विभाग प्रमुख चेतन मुंगमोडे,डोंगरगाव,विभाग प्रमुख रीतीक मेश्राम मारोडा,विभाग प्रमुख विनोद चलाख हळदी,महेश चौधरी, सुनीलकाळे माजी ता.प्र.अमित आयलानी युवासेना शहर प्रमुख,विजय शेंडे शाखा प्रमुख,चेतन जाधव नांदगाव,शोएब शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments