Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तालुक्यात सुगंधीत तंबाखू जप्त, आरोपी फरार

मूल तालुक्यात सुगंधीत तंबाखू जप्त, आरोपी फरार

मूल प्रतिनिधी
 
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मुल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजोली या गावांमध्ये मुल येथिल लखन मानकानी हा एका घरी गोडाऊन म्हणून एक खोली किरायाने घेतला असून तिथे अवैद्य प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू चा साठा ठेवला असल्याची माहिती मिळाल्या नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गडादे, पोहवा. दिपक डोंगरे, पोशी. गोपीनाथ नरोटे, अमोल सावे यांनी धाड टाकून 5 प्लास्टिक चुंगडया मध्ये 800 पाऊच प्रत्येकी 200 ग्राम वजनाचे होला हुक्का शिशा तंबाखु ने सिलबंद असलेले पाऊच व एकूण 200 डब्बे प्रत्येकी 50 ग्राम वजनाचे मजा, 108 हुक्का शिशा तंबाखु ने भरलेले सिलबंद डब्बे असा एकूण एक लाख 78 हजार 200 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments