Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

प्रिपेड मिटर ग्राहकांवर अन्यायकारक रूपेश मारकवार ,आंदोलनाचा इशारा

प्रिपेड मिटर ग्राहकांवर अन्यायकारक
रूपेश मारकवार ,आंदोलनाचा इशारा

मूल : अमित राऊत

प्रिपेड मिटर ग्राहकांवर अन्यायकारक ठरणारे आहे.या मीटर योजनेचा महावितरण कंपनीने फेरविचार करावा अशी मागणी होत आहे.राज्यात शेतकरी,शेतमजूर,कामगार,दलित,आदिवासी बहूल सर्वसामान्य जनतेचा अधिवास आहे.आधीच त्यांना भरमसाठ वीज बिलाचे आर्थीक झटके सहन करावे लागते.त्यात अन्यायकारक ठरणारे प्र्रिपेड मिटर धोरण राबविल्यास ते अधिक त्रासदायक ठरेल.राज्यातील साधनसंपत्तीवर येथे विदयुत निर्मिती होते.तरीही,शासन दोनशे युनिट र्प्यंतचे विज बील माफ करू शकत नाही.इतर राज्यात दोनशे युनिट वीज बील माफ करण्याचे धोरण राबविण्याचा निर्णय घेतला जात आहे.महाराष्टातील वीज दर इतर राज्याच्या तुलनेने जास्त आहे.एकीकडे महागाई वाढत आहे.दुसरीकडे प्रिपेड मिटर लावून जनतेवर महावितरण कंपनी अन्याय करीत आहे.ही बाब गंभीर असून या योजनेचा महावितरण कंपनीने फेरविचार करावा आणि महाराष्ट वासीय जनतेला न्याय दयावा.अन्यथा रस्त्यावर उतरून महावितरण कंपनीच्या विरोधात  आंदोलन केल्या जाईल असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते रूपेश मारकवार यानीं दिला आहे.याबाबत त्यांनी आज तहसिलदार यांच्या मार्फतीने जिल्याचे पालकमंत्री आणि  राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन दिले.

Post a Comment

0 Comments