Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

आयरा कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे सुयश

आयरा कोचिंग क्लासेस च्या विद्यार्थ्यांचे सुयश 

मूल प्रतिनिधी


दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 100% निकाल जपणारी मूल मधील एकमेव कोचिंग क्लासेस म्हणजे आयरा एज्युकेशन मूल ,दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 मध्ये 100 % निकालाची परंपरा कायम ठेवलेली असून , आज दिनांक 1 जून 2024 ला कोचिंग मधील गुणवंत विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहूने म्हणून विविध कार्यकारी संस्था मूल चे संचालक व श्री साई मित्र परिवार चे सचिव श्री विवेक बळवंतराव मुत्यलवार व आयरा एज्युकेशन मूल चे संचालक श्री सुरज आबाजी वसाके उपस्थित होते. कोचिंग क्लास मधून प्रथम क्रमांक व मूल तालुक्यातून चौथा क्रमांक कुमारी ख़ुशी पाऊलबुधे 95.20 टक्के, तसेच द्वितीय क्रमांक कुमारी लीना शेंडे 93.20 टक्के तर कुमार गीतेश गाउतुरे 92.40 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविला. व तसेच कोचिंग मधील संपूर्ण 50 विद्यार्थी 80.00 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले ,प्रत्येक विद्यार्थ्यांचा सत्कार करून व मोलाचं मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments