Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे भाजपाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

मूल येथे भाजपाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी 

मूल प्रतिनिधी
                      
प्रजाहितदक्ष पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती भाजपा मूल च्या वतीने दिनांक 31 मे ला संध्याकाळी सहा वाजता भाजपा कार्यालय मुल येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरपरिषद मूलचे माजी पाणीपुरवठा सभापती मिलिंद खोब्रागडे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा ओबीसी आघाडी मूल शहर अध्यक्ष युवराज चावरे यांनी केले.  उपस्थितांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य हे लोककल्याणकारी होते. त्यांनी मंदिरे व तीर्थस्थानांचे जीर्णोद्धार करून संरक्षण दिले. भारतीय शिल्प, कला, साहित्य, संस्कृती यांची त्यांनी अमोल सेवा केली. त्यांनी सर्व भारतीयांना एकत्रित करून इंग्रजांविरुद्ध लढा पुकारला व भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. त्यांनी त्या काळातही स्त्रियांचा योग्य सन्मान केला व प्रजापालनाचे उत्कृष्ट कार्य केले. अशा या प्रजा वत्सल रणरागिणीचे विचार सर्वांनी आत्मसात करावे असे आवाहन केले.
यावेळी नगरपरिषद मूलचे माजी बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, ग्रामगीताचार्य सुखदेव चौथाले आदींनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नगरपरिषद मूल चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी नगरसेवक अजय गोगुलवार,  नगरपरिषद मूल चे माजी पाणीपुरवठा सभापती अनिल साखरकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बोबाटे, धनगर समाज मूल चे अध्यक्ष दिलीप यारेवार, प्रज्वल भोयर,गणेश मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नगरपरिषद मूल चे माजी सभापती अनिल साखरकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments