Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

कोतवालाच्या दोन्ही मुलींनी मिळविले दहावी च्या परीक्षेत सुयश, सर्वत्र कौतुक

कोतवालाच्या दोन्ही मुलींनी मिळविले दहावी च्या परीक्षेत सुयश, सर्वत्र कौतुक 

मूल (अमित राऊत)

मूल शहरातील विहीरगाव येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणून कार्यरत असलेले संजय बावणे यांच्या दोन्ही मुली दहावीच्या परीक्षेत सुयश मिळविले आहे. अक्षरा बावणे 90.20% तर आकांक्षा बावणे हिला 89.60% गुण मिळाले आहे.  या दोन्ही सख्या बहिणीं असुन त्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

मुल शहरातील नवभारत कन्या विद्यालयातील या दोन्ही बहिणी विद्यार्थिनी आहेत. विशेष म्हणजे त्या दोन्ही बहिणी जुळ्या आहेत. मुल तालुक्यात असलेल्या नलेश्वर या ग्रामीण भागातील मुली असून शहरात येऊन शिक्षण घेण्याची आशा बाळगले. आकांक्षा आणि अक्षराला त्यांचे वडील हे शिक्षणात येणाऱ्या कुठल्याही अडचणींना सामोरे जात सर्व गोष्टी पूर्ण केल्या. आणि शिक्षणात काहीही कमी पडणार नाही असा ठाम विचार मुलींचे वडील संजय बावणे यांनी केला. दहावीच्या परीक्षेत सुयश मिळविलेल्या या दोन्ही बहिणी प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा बाळगले आहेत.

Post a Comment

0 Comments