Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

चक्क शहरात रानगव्याचे दर्शन, नेमक कुठे आढळला रानगवा?

चक्क शहरात रानगव्याचे दर्शन, नेमक कुठे आढळला रानगवा?

मूल (अमित राऊत)
 

मूल शहरातील चौखुंडे हेटी व बाजार समितीच्या आवारात दिनांक २५ शनिवार च्या रात्री ११:४५ च्या दरम्यान एक रानगवा भटकुन फीरतांना तेथील रहिवासी यांना दीसला. याची माहीती स्थानीक नागरिक विक्की कोहळे यांनी संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे, मनोज रणदिवे व योगेश गावंडे यांना दीली. माहीती मिळतात संस्थेच्या सदस्यांनी घटणा स्थळी जाऊन तो रानगवा आहे याची खात्री करून वन कर्मचारी यांना मोबाईल द्वारे माहिती दिली.

वनविभागाचे कर्मचारी, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य व स्थानिक नागरिकांनी त्या रानगव्याला सुरक्षित पणे जंगलाच्या दिशेने परतविले यावेळी मूल प्रादेशिक चे क्षेत्र सहाय्यक एम.जे. मस्के एफ डी सी एम चे क्षेत्र सहाय्यक आर.जी.कुमरे वनरक्षक एस.आर. ठाकुर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments