Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तालुक्यात चोरबिटीचा धंदा तेजीत, शेतजमिनी नापीक होण्याची शक्यता

मूल तालुक्यात चोरबिटीचा धंदा तेजीत, शेतजमिनी नापीक होण्याची शक्यता 

मूल प्रतिनिधी

आंध्र प्रदेशातून चोरबिटी आणून महाराष्ट्रात बंदी असताना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत मूल तालुक्यातील जुनासुर्ला, चांदापूर, बेंबाळ, नवेगाव भुजला, बोरचांदली आदी गावांत भाडेतत्त्वावर जमिनी घेऊन लागवड करण्याची तयारी केली जात आहे. या चोरबिटी लागवडीमुळे शेतजमिनी नापीक होण्याची शक्यता असते. त्यामुळे कृषी विभागाने यास आळा घालावा, अशी मागणी आहे.

धान उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात राबराब राबावे लागते. अशी मेहनत घेतल्यानंतरही उत्पादन खर्च व नफा याचा ताळमेळ घातला, तर खर्च वजा जाता हातात काही उरत नसल्याची ओरड शेतकऱ्यांत सुरू आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर शेतजमिनी देऊन मोकळे होण्याचा कल शेतकऱ्यांचा दिसत आहे. बहुतांश त्याचा फायदा घेत आंध्र प्रदेशातील काही इसम शेतात चोरबिटी लावण्यासाठी गावातील प्रमुख व्यक्तीच्या माध्यमातून फिल्डिंग लावतात. त्यामुळे कमी किमतीत जमिनी भडेतत्त्वावर घेण्याचा सपाटा सुरू केल्याचे मूल तालुक्यात दिसत आहे. त्या जमिनीत शासनाने बंदी घाललेल्या चोरबिटीची लागवड करून लाखोंचे उत्पन्न मिळविले जात आहे. बहुतांश गावांत अशा लोकांनी जमिनी घेऊन बस्तान मांडले आहे. चोरबिटीच्या लागवडीने जमिनी नापीक होत असल्याने शासनाने बंदी घातली. मात्र, काही जण खुलेआम हा प्रकार करीत असताना कृषी विभागाचे लक्ष नाही.


प्रतिक्रिया 
किशोर चौधरी, कृषी अधिकारी पंचायत समिती, मूल

मूल तालुक्यात चोरबिटी आंध्र प्रदेशातील काही इसम आणून लागवड करतात, अशी माहिती मिळाली. मागील महिन्यात अशाच प्रकरणी चांदापूर येथे विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. याबाबत योग्य माहिती दिल्यास नक्कीच कारवाई केली जाईल.

Post a Comment

0 Comments