Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मंदिराच्या नावाने जागा हडपून ताब्यात घेण्याचे प्रयत्न, ओपन स्पेस मधील अवैध बांधकाम तात्काळ थांबवा - श्रमिक नगर प्लॉट धारकांची मागणी

मंदिराच्या नावाने जागा हडपून ताब्यात घेण्याचे प्रयत्न

ओपन स्पेस मधील अवैध बांधकाम तात्काळ थांबवा - श्रमिक नगर प्लॉट धारकांची मागणी

मूल (अमित राऊत)

मूल शहरातील श्रमिक नगर वार्ड क्रमांक 8 येथील सर्वे नंबर 94 मध्ये एकूण 90 प्लॉट धारक आहे. त्यात २९९२ स्केअर मीटर एवढा ओपन स्पेस आहे. शासकीय नियमाप्रमाणे ओपन स्पेस मध्ये फक्त 10 ते 16 टक्के एवढेच बांधकाम करायचे असते परंतु या ठिकाणी अगोदरच ओपन स्पेस मध्ये मंदिर 2500 स्केअर फुट, एक सभागृह २००० स्क्वेअर फुट, एक स्वयंपाक गृह 500 स्केअर फुट, एक सौचालय व अतीक्रमित शाळेचा बांधकाम झालेले आहे. उर्वरित जागेवर मंदिराच्या नावाने सभागृह अंदाजे 5000 स्क्वेअर फुटचे अवैध बांधकाम सुरू करून जागा व्यापनाचा गैरप्रकार सुरू आहे. 

असेच गैर कायदेशीर बांधकाम सुरू राहिल्यास मूळ प्लांटधारकांना हक्काची जागा व त्यांचे मुलांना खेळण्याकरिता तसेच वयोवृद्ध व्यक्ति करिता फिरण्यासाठी जागा राहणार नाही. त्यामुळे यामध्ये ग्रीन जिम, ट्रॅक, बगीचा, संपूर्ण सौंदर्यकरण करण्यात यावे. असे निवेदन श्रमिक नगर येथील प्लॉट धारकांनी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी यशवंत पवार यांना दिले आहे.

निवेदन देताना प्रशांत कोहळे, अरविंद गिरी, अमोल बच्चूवार आदी प्लॉट धारक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments