Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विद्यार्थिनीच्या मृत्यूने मूल तालुक्यात खळबळ Shock over the death of the student

विद्यार्थिनीच्या मृत्यूने मूल तालुक्यात खळबळ

मूल प्रतिनिधी

मूल तालुक्यातील सुशी येथील जिजामाता प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 29 जानेवारी ला घडली. कु.मित्तल केशव कोंडागुर्ले वर्ग सहावा राहणार गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मरपल्ली असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे.

सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक आश्रम शाळेत विद्यार्थी निवासी राहतात. 31 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता नृत्याचे सराव सुरू होता यात मित्तल कोंडागर्ले ही सराव करीत असताना चक्कर आली. तिला छातीत दुखत असल्याने शाळेचे चपराशी सोंडूले यांनी मूल उपजिल्हा रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर केले. डॉक्टरांनी मित्तल ला घोषित केले. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरूनुले यांनी आमचे प्रतिनिधी शी बोलताना दिली.

ही घटना शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे, महिला आघाडी संघटिका कुसुमता उदार यांना माहिती होताच त्यांनी मृत्तकाच्या नातेवाईकांसह या घटनेची सखोल चौकशी करावी, शाळेची मान्यता रद्द करा आणि संबंधितावर गुन्हे दाखल करण्याचे मागणी केली.असल्याचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. प्रकरण चांगलेच वळण घेत असल्याची माहिती आहे. सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक आश्रम शाळेला पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती आहे.

Post a Comment

0 Comments