Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

विद्यार्थिनींची राईस मिल ला क्षेत्रीय भेट, जाणून घेतली धान प्रक्रिया उद्योग

विद्यार्थिनींची राईस मिल ला क्षेत्रीय भेट, जाणून घेतली धान प्रक्रिया उद्योग

मूल (अमित राऊत)

नवभारत कन्या विद्यालय मूल यांच्यावतीने आज क्षेत्रभेटी अंतर्गत धानावरचे प्रक्रिया उद्योगाची माहिती विद्यार्थ्यांनीनी करवून घेतली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार यांचे मार्गदर्शनात हा कार्यक्रम घेण्यात आला.

मूल येथील प्रख्यात तांदूळ उत्पादक जीवन कोंतमवार यांचे जगदंबा राईस मिल येथे विद्यार्थिनींनी धानाचे प्रकार, त्यावर प्रक्रिया कशी केली जाते? तांदूळ उत्पादनात विविध प्रक्रिया कशी केली जाते? पॅकेजिंग आणि मार्केटिंग कशी केली जाते याबाबत जीवन कोंतमवार  यांच्याकडून माहिती करून घेतली. जीवन कोंतमवार  यांनी सर्व विद्यार्थिनींना मिलचे प्रत्येक भाग समजावून सांगितले.

या कार्यक्रमाचे नियोजन विजय सिद्धावार यांनी केले, आभार प्रदर्शन कुमारी अक्षरा गुलबमवार हिने केले. मूल शहरात एखाद्या राईस मिल ला विद्यार्थ्यांनी भेट देऊन या उद्योगाची माहिती घेण्याचा पहिलाच उपक्रम आहे.

Post a Comment

0 Comments