Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोह संपन्न

राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोह संपन्न

मूल प्रतिनिधी

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ महिला शाखा मूल-सावली तर्फे आयोजित राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोह  घेण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी व स्त्रियांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गीतगायन, नृत्य व प्रबोधन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रत्नमाला गेडाम यांनी भूषविले. तर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विविध पुरस्कार प्राप्त सरपंच शर्मिला रामटेके नवेगाव पांडव, तरुणांची प्रेरणा असलेले आंतरराष्ट्रीय चेव्हणिंग शिष्यवृत्ती धारक ऍड. दीपक चटप हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रज्ञा गावतुरे,  बबिता बोबडे, बबिता गेडेकर, कल्पना पेंदोर, हिरालाल भडके, अमित राऊत पत्रकार मूल उपस्थित होते.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव प्रथम, सेंट अंन्स हायस्कूल द्वितीय, जिल्हा परिषद शाळा तडाळा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत प्रणय संतोष लेनगुरे प्रथम , ऋतुजा दीपक मोहुर्ले द्वितीय, तर समीक्षा परशुराम निकेसर तृतीय या तिन्ही चीचाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले.मूल तालुक्यातील फिस्कुटी, चिचाळा, डोंगरगाव, तडाळा व स्थानिक महिला व विद्यार्थ्यांनी गायन नृत्य अशा विविध कार्यक्रमात भाग घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदा तुरे तर आभार प्रदर्शन कुलोत्पना कुळमेथे यांनी केले. परीक्षक म्हणून वर्षा मुरले व हिरालाल भडके यांनी काम पहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्या कोसे, गीता साखरे, राजश्री कुकुडकर, कुलोत्पना कुळमेथे, ज्योती निमगडे, संगीता निमसरकार,कल्पना वाळके, अश्विनी बारसागडे,नीता मेश्राम, डॅनिअल देवगडे, बबन दुर्गे, सुनील निमगडे, महेंद्र खोब्रागडे, भोयर सर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments