Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजने अंतर्गत 141 प्रकरणे मंजूर

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजने अंतर्गत 141 प्रकरणे मंजूर

मूल प्रतिनिधी

शासनाने निराधार ,अपंग,वृद्धलोकांसाठी संजय गांधी निराधार योजना समितीच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्याची योजना कार्यन्वित केली आहे.त्या अनुषंगाने मूल तालुक्यात असलेल्या संजय गांधी निराधार समितीची दिनांक 30 जानेवारी 2024 ला मासिक आढावा सभा सौ. वंदना ताई अगरकाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आले.
संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विविध योजनांचे अर्ज मंजूर करण्यात आले.
श्रावणबाळ- 64प्रकरणे
वृद्धापकाळ-03 प्रकरणे 
संगायो निराधार -56प्रकरणे 
इंगायो विधवा-18प्रकरणे 
 इंगायो अपंग-00
असे एकूण 141 प्रकरणे मंजूर करण्यात आले.साधक बाधक चर्चा झाली.ज्या लाभार्थ्यांना पैसे बरोबर येत नाही ज्यांचे अर्ज अनेक दिवसांपासून मंजूर झालेले नाही.अश्या सर्व लाभार्थ्यांनि समिती ला माहिती दयावी ज्यामुळे लाभार्थ्यांना सहकार्य करता येईल. त्रुटी असणारे अर्ज अर्जदारांकडून पूर्तता करण्यात येऊन सादर करण्यात येतील. व दर महिन्यात संजय गांधी निराधार योजनेची बैठक होणार असल्याची यावेळी ठरवण्यात आले.यावेळी उपस्थित सौ. वंदना ताई अगरकाटे अध्यक्ष ,सौ. पूजा ताई डोहने सदस्य,सौ. उर्मिलाताई कडस्कर सदस्य, श्री.मुन्ना कोटगले सदस्य,श्री.अनुप नेरलवार सदस्य,श्री.दिलीप पाल सदस्य,श्री.राकेश ठाकरे सदस्य,श्री.नामदेव कावळे सदस्य,
नायब तहसीलदार संगायो मूल,
संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल, मुख्याधिकारी नगरपरिषद मूल

Post a Comment

0 Comments