Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

"बेबस" विदर्भाच्या मातीतील कलावंतांचा चित्रपट, 12 जानेवारीला सिनेमागृहात "Babas" Hindi movie, in theaters on January 12

"बेबस" विदर्भाच्या मातीतील कलावंतांचा चित्रपट, 12 जानेवारीला सिनेमागृहात 

मूल (अमित राऊत)


विदर्भातील मातीतील कलावंताचा चित्रपट असल्यांने, बेबस हा चित्रपट सर्वांनी बघावा असे आवाहन या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक आणि कलावंत कृपाल लांजे यांनी केले.  प्रेस क्लब मूलच्या वतीने आयोजीत विश्राम गृह मूल येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी हे आवाहन केले. पत्रकार परिषदेला बेबस चित्रपटात काम करणारे कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण बालपणापासूनच नाट्यकलावंत असल्यांने, अभिनयाच्या क्षेत्रात आपली ओढ होती.  अनेक नाटकात काम करतांना, झाडीपट्टीतील समृध्द अभिनयाला न्याय मिळत नसल्याची खंत होती, ही खंत भरून काढण्यांची मनात कल्पना होती, ती बेबसच्या निमीत्ताने काढता आली असे लांजे यांनी एका प्रश्नाचे उत्तरात माहीती दिली. 

बेबस हा सामाजीक हृदृयस्पर्शी चित्रपट आहे, कुटूंबासह पाहण्यासारखा आहे, येत्या 12 जानेवारीला विदर्भातील मूल, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, साकोलीसह अनेक चित्रपटगृहात हा सिनेमा प्रदर्शीत होणार आहे.  विदर्भात तयार होणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट असल्यांची त्यांनी माहीती दिली. या चित्रपटाची शुटींग मूल शहरातील विविध भागासह तालुक्यात या चित्रपटाची शुटींग झाली.  विदर्भातीलच 150 कलावंत या चित्रपटात असून, बेबसमध्ये 4 गाणी सुध्दा चित्रीत केल्यांचे त्यांनी कृपाल लांजे यांनी सांगीतले. चित्रपटाला केंद्रिय सेंसार बोर्डाची परवाणगी मिळविण्यासाठीचे अनुभव विलक्षण असल्यांचे त्यांनी सांगीतले तर चंद्रपूर—​गडचिरोली जिल्हयातील कलावंत एवढा दर्जेदार सिनेमा बनवित असल्यांने सेंसार बोर्डाचे सदस्यांनी स्टॅंडीग आॅडीशन देत आमचा उत्साह वाढविल्यांचे त्यांनी यावेळी सांगीतले.चित्रपटाचे शो चे बुकींग सुरू असून, नागरीकांनी आपल्या मातीतील कलावंतानी साकार केलेली कला पाहण्यासाठी चित्रपट आवर्जुन पहावा असे आवाहन बेबसच्या कलावंतानी केले. 

पत्रकार परिषदेला बेबस चित्रपटात काम करणारे आशुतोष सादमवार, ममता गोंगले, सचिन गेडाम , संतोष कुमार, सुनील कुकुडकर, नीलेश जंपलवार, प्रफुल येलचलवार, कुमुदिनी भोयर, रितेश चौधरी, नयना खोब्रागडे, माही देशवाल, करिष्मा मेश्राम, अविनाश पाटील, मयूर राशेट्टीवार, भास्कर पिंपळे,अमोल गेडाम ,मिष्टी बोलिवार, अनिरुद्र सादमवार, विनोद बोलिवार ,  आकाश आरेवार , सोनू भांडे , लेखराम हुलके , अमित पिपरे , रुपाली राऊत , प्रणित नमुलवार , क्रीष्णा सुरमवार , संदिप मोहबे , अनिल उईके , प्रभाकर भोयर, चैतन्य भोयर,शालिनि सुटे, सोनू म्हस्के, अमर  नक्षिणे, देवीका मडावी, ऋतुजा उराडे, अंकिता चर्लावार, वर्षा संगीडवार, अमोल अकालूरवार, आकाश आरेवार, सुभाष माकडे,  सुभाष गेडाम, प्रियदर्शन मडावी, मंजुषा चुधरी, विनत्रा आत्राम, संदिप जुलमे आणि अन्य १५० कलाकारांच्या कलेची उत्तम मेजवानी पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच संगीत संतोष कुमार यांनी लिहिले असुन संगीत बद्ध केले आहे. भास्कर पिंपळे यांनी, चित्रपटाचे गीत अंकीता टाकले आणि रुपाली राऊत यांनी गायले तसेच या चित्रपटाचे छायाचित्र संचालन धर्मेश कावळे यांनी केले व मुख्य संपादक म्हणुन सिद्धार्थ राऊत यांनी भूमीका पार पाडली.

Post a Comment

0 Comments