Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बालविकास प्राथमिक शाळेत विज्ञान मेळावा संपन्न Science fair

बालविकास प्राथमिक शाळेत विज्ञान मेळावा संपन्न

मूल प्रतिनिधी

समाज सुधारक शिक्षण प्रसारक मंडळ, मूल द्वारा संचालित बालविकास प्राथमिक शाळा, मूल येथे दिनांक 4 डिसेंबर 2023 ला विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.विज्ञान मेळाव्यात इयत्ता 6 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका
सुनिता अनिल बुटे यांचे हस्ते करण्यात आले. या विज्ञान मेळाव्यात, सेक्युरिटी अलार्म,मार्बलिंग आर्ट,भूकंप सूचक यंत्र,सौर विद्युत, होलोग्राम,सौर माला, ग्रहणावर आधारित समज- गैरसमज,वॉटर पंप,पाणी अडवा पाणी जिरवा,सौर ऊर्जेची साठवणूक,जलशुध्दीकरण यंत्रणा यावर तसेच इतर काही विषयावर आधारित एकूण 20 प्रतिकृतींचा समावेश होता.
उपरोक्त प्रतिकृतींचे परीक्षण मान. शैलेश देवाडे सर,सहायक शिक्षक नवभारत कन्या विद्यालय, मूल यांनी केले.

शालेय स्तरावर आयोजित बाल विज्ञान मेळाव्यातून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला चालना मिळते. विद्यार्थ्यांची शोधक वृत्ती वाढते. तंत्रज्ञान विकसित होत असते असे मोलाचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बटे यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
सदर मेळाव्याला इयत्ता 1 ते 8 वर्गातील पालकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या जिज्ञासू वृत्तीचा गौरव केला. तसेच कौतुकाचा अभिप्राय नोंदवला. तसेच माजी विद्यार्थ्यांनी सुधा सदर मेळाव्याला भेट देऊन शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

Post a Comment

0 Comments