Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तालुक्यातील रेती, मुरूम, भिसीचे अवैध उत्खनन थांबवावे - दत्तात्रय समर्थ Illegal mining of Sand, Murum, Bhisi

मूल तालुक्यातील रेती, मुरूम, भिसीचे अवैध उत्खनन थांबवावे - दत्तात्रय समर्थ

मूल (अमित राऊत)

मूल तालुक्यातील अवैद्य रेती, मुरूम, भीसी चे उत्खनन थांबविण्याची मागणी सामान्य कामगार सेवा चे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. मूल तालुक्यातील सर्व घाटावरील रेती उपसा व वाहतूक प्रक्रिया 31 सप्टेंबर 2023 पासून संपली आहे. मुल तालुक्यातील झालेला नसताना भादुर्णा, डोंगरगाव, चिचाळा, हळदी, नलेश्वर, भेजगाव इतर घाटावर मोठ्या प्रमाणात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत असून मोठी हानी होत आहे.

घाटांवर साठा करून ठेवलेल्या रेतीची वाहतूक सुरू आहे ही वाहतूक विना परवाना अवैधरित्या सुरू आहे महसूल अधिकारी व कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. रेती सोबतच विविध ठिकाणावरून मुरूम बीसी मातीचे उत्खनन व वाहतूक बेधडक सुरू आहे वाहतूक परवानगी पेक्षा अधिक पटीने या गोणखणीजांचे उत्खनन व हायवे गाड्याद्वारे वाहतूक सुरू आहे. पोकलँड, जेसीबी मशीन द्वारे उपसा करीत असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे कामगारांवर अन्याय होत आहे. या बाबींचे गंभीरतेने चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देताना लक्ष्मण चटारे, बंडू गुरूनुले, विनोद आंबटकर, प्रमोद गेडाम, अरविंद दहिवले, संतोष चिताडे,भाऊजी लेनगुरे, नितीन देशमुख, कुणाल शेरकी, जितेंद्र याटकर्लेवार, बंडू घेर, प्रभाकर कावळे, वनराज बेडूकर , सत्यवान गेडाम, देवानंद पेरके, वनराज पेडूकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments