Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल येथे खैरे कुणबी समाजाचा स्नेहमिलन व सत्कार सोहळा संपन्न, समाजातील युवकांनी पुढे येण्याचे आवाहन Calling the youth of the society to come forward

मूल येथे खैरे कुणबी समाजाचा स्नेहमिलन व सत्कार सोहळा संपन्न, समाजातील युवकांनी पुढे येण्याचे आवाहन

मूल (अमित राऊत)


खैरे कुणबी समाज संघटना, मूल तर्फे स्नेहमिलन व सत्कार सोहळा कार्यक्रम थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष नत्थू पाटील आरेकर, उद्घाटक समाजाचे भूषण माजी नगरसेवक प्रभाकर भोयर, प्रमुख अतिथी जिल्हा प्रतिनिधी सुधाकर चरडुके, माजी नगराध्यक्षा प्रा.रत्नमाला भोयर, पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, माजी प्राचार्य गजानन नागापुरे, संस्कृती साडी सेंटर चे संचालक मार्कंडी लाडवे, रयत नागरी बँकेचे अध्यक्ष निपचंद शेरकी, माजी नगरसेवक प्रशांत लाडवे, नगरसेविका विद्या बोबाटे, एकता अर्बन बँकेचे डोमाजी बट्टे, डॉ.आनंदराव कुळे, व्यापारी अशोक डंबारे आदी पाहुणे उपस्थित होते.

खैरे कुणबी समाजाचे प्रश्न, समस्या सुटाव्यात त्यावर विचार मंथन व्हावे, समाजाचे एकत्रीकरण, एकोप्याची भावना निर्माण व्हावी. समाजातील व्यक्तींचा सन्मान व्हावा. समाजातील युवकांनी पुढे यावे, आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाला आपले देणे लागते याची जाणीव ठेवावी. समाज जागृती करिता सतत कार्यक्रम होत राहावे, अशा विविध विषयावर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमात मूल तालुक्यातील खैरे कुणबी समाजातील नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि मूल बाजार समितीचे नवनिर्वाचीत संचालक आदींचा सत्कार शिल्ड ,रोपटे व गुलाबाचे फुल देऊन मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात माजी सिनेट सदस्य सुनील शेरकी यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि माहिती विशद केली. कार्यक्रमाचे संचालन धनराज कुळे, रीना ठाकरे तर आभार अमित राऊत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुंदर मंगर, नंदकिशोर शेरकी, अतुल तिवाडे, मनोहर शेरकी, देविदास मशाखेत्री, सुधाकर झरकर, संजीवनी वाघरे, अर्चना चावरे, सुनिता तिवाडे, भावना चौखुंडे, किरण चौधरी आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमात मूल तालुक्यातील युवक, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Post a Comment

0 Comments