Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल शहरातला सच्चा कार्यकर्ता हिरावला, माझ्या आठवणीतला विनोदभाऊ कामडी A true worker was lost

मूल शहरातला सच्चा कार्यकर्ता हिरावला, माझ्या आठवणीतला विनोदभाऊ कामडी

मूल (अमित राऊत)


मूल शहरातील नगर परिषदेतील माजी नगरसेवक विनोद कामडी यांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकून मन हे लावले आणि चटकाच बसला. या आधी पण विनोद भाऊंनी असाच चटका दिला होता मात्र नंतर स्थिरावले होते. आज मात्र विनोद भाऊ आमच्यात नाही याचे मोठे दुःख आहे. विनोदभाऊ कामडी सारखा कार्यकर्ता पुन्हा होणे नाही, सच्चा कार्यकर्ता आमच्यातून हिरावला आहे. युवकांसाठी प्रेरणादायी, निराधारांना आधार देत त्यांना स्वतःच्या गाडीवर बसून सरकारी दवाखान्यात नेताना खुल्या डोळ्याने बघितले आहे. वृद्धापकाळ, श्रावण बाळ, संजय गांधी निराधार अशा विविध योजना निराधारांना मिळवून देण्याची धडपड आज पर्यंत बघत राहिलो. शेतकऱ्याचे आंदोलन युवकांचे आंदोलन नागरिकांच्या विविध समस्या स्वतःच्या वार्डातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याकरिता नेहमीच तत्परता दाखविताना आम्ही बघितले.

घरी अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीत असतानाही स्वखर्चाने वार्डातील लोकांचे काम करत राहिला. मी सर्च टीव्ही प्रतिनिधी असताना बांधकाम विभागात एका समस्ये करिता कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवक विनोदभाऊ कामडी यांचा "झोपला आंदोलन" आणि ती बातमी कव्हर केलेला क्षण माझ्या आजही लक्षात आहे.  साधी राहणी उच्च विचार आणि प्रामाणिकपणे केलेला काम आजही सर्वांच्या लक्षात राहीलच. काही महिन्या आधी विनोद भाऊंना ब्रेन ट्यूमर झाला त्यासाठी नागपूरला भरती करावे लागले होते. 

नागपूरच्या प्रायव्हेट दवाखान्यात भरती असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड कामडी परिवारावर आला. ही वार्ता पसरतात वार्डातील आणि मूल शहरातील सोशल मीडियावर विनोद भाऊंच्या मदती करिता आव्हान करण्यात आले. यात श्री साई मित्र परिवाराने आवाहन केल्यानंतर काही रक्कम जमा झाली. ती रक्कम विनोद भाऊंच्या परिवाराकडे देण्यात आली. काँग्रेस परिवाराकडून तसेच भाजपा आणि इतरांकडूनही बरीच मदत झाली. विनोद भाऊंच्या उपचाराकरिता सहकार्य झाले. हे सर्व विनोद भाऊंच्या लोककार्य, लोकसेवा, निस्वार्थी काम यामुळे घडू शकले. त्यानंतर लोकांच्या दुवेमुळेच गंभीर आजारातून स्थिरावले. त्यानंतर पुन्हा विनोदभाऊ कांबडी हे सतत लोकसेवेचे काम अविरत सुरूच ठेवले होते. 

मला काल परवाच निराधाराचा कामाकरिता तहसील कार्यालयात भेट झाली. भाऊ तब्येत कशी आहे, असे विचारले असता वरती हात दाखवून देव आपल्या सोबत आहे असे उद्गार काढलेव व निघून गेले. मात्र आज दिनांक 30 नोव्हेंबरला सायंकाळी दुखत वार्ता मिळाली आणि धक्कात पोहोचला. विनोद भाऊ यांच्या संपूर्ण परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.  भाऊ नेहमीच आठवणीत राहील. "भावपूर्ण श्रद्धांजली"

Post a Comment

0 Comments