Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत धनंजय पोटे प्रथम story writing competition

राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत धनंजय पोटे प्रथम

ब्रह्मपुरी प्रतिनिधी

नागरी भागातील कला, संस्कृती, साहित्य यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिकांमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटनेच्या वतीने नागरी साहित्य लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी नगर परिषदेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी धनंजय पोटे यांना कथालेखन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहिर करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गणेश देशमुख व प्रशांत रसाळ यांनी दिली आहे.

कथा लेखन, कविता लेखन, लेख लेखन अशा तीन प्रकारात या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये स्वच्छता कर्मचारी, शिपाई , साहाय्यक प्रकल्प अधिकारी, मुख्याधिकारी, आयुक्त पदावरील अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते. या स्पर्धेचे परीक्षण जेष्ठ साहित्यिक नीलिमा फाटक यांनी केले. लेखक धनंजय पोटे यांनी या स्पर्धेसाठी ' भुजंग ची गोष्ट' ही कथा पाठवली होती.
राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेमध्ये धनंजय पोटे यांना प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल ब्रह्मपुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अर्शिया जुही, इंजिनीयर मनोज आंबोर, कर निर्धारक राजेश चौधरी, कार्यालय अधीक्षक मंगेश बोंदरे, आरोग्य निरिक्षक नितेश रगडे, प्रमोद येरणे, प्रितेश काटेखाये लक्ष्मीकांत आपदेवे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments