Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

सुखदेव चौथाले "ग्रामगीताचार्य पदवी ने सन्मानित" Grama Geetacharya Degree

सुखदेव चौथाले "ग्रामगीताचार्य पदवी ने सन्मानित"

मूल प्रतिनिधी

चंद्रपुर जिल्हातील मूल शहरातील गुरुदेव सेवा मंडळ मूल येथील सक्रीय कार्यकर्ते सुखदेव चौथाले यांना गुरुकुंज मोझरी येथे ग्रामगीताचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ द्वारा संचालीत ग्रामगीता जीवन- विकास परीक्षा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवी सन 2023-24 या कार्यक्रमात सन्मानित केले. यावेळी पुष्पाताई बोंडे, बंडोपंत बोढेकर, ग्रामगीताचार्य गुलाबराव खवसे, सवाई मॅडम, दहीकरताई जनार्दन बोथे, संस्थेचे अध्यक्ष व गमे काका,सर्वाधिकारी याचे प्रमुख ऊपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाचे संचालन सचिव गोपालजी कडु यांनी केले. महाराष्ट्रातील 30 ग्रामगीताचार्य यांना  हा पुरस्कार मोठ्या थाटामाटात देण्यात आला. चंद्रपुर जिल्ह्यातील यावेळी तीन व्यक्तींना ग्रामगीताचार्य पदवी  सन्मानाने देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला असंख्य गुरुदेव भक्त प्रामुख्याने उपस्थित होते. सुखदेव चौथाले यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments