Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

बिरसा मुंडाचा लढा सामान्य जनतेच्या न्यायासाठी - डॉ.अभिलाषा बेहरे Birsa Munda's fight for common people's justice - Dr. Abhilasha Behre

बिरसा मुंडाचा लढा सामान्य जनतेच्या न्यायासाठी - डॉ.अभिलाषा बेहरे

मूल प्रतिनिधी

भारताच्या स्वातंत्रलढ्यात आदिवासी शहिदवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रेसर होते .बिरसा मुंडाचे उलगुलांन म्हणजे सामान्य जनतेच्या विद्रोहाचे प्रतीक होते.त्यामुळेच समस्त बहुजन समाजाचे ते आदर्श आहेत असे प्रतिपादन जननायक बिरसा मुंडा जयंती उत्सव समिती मूल च्या वतीने कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलतांना केले.*

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. वासुदेव आत्राम ,उदघाटक म्हणून प्रा. विजय लोनबले ,प्रमुख मार्गदर्शक मा.डॉ.समीर कदम तसेच मुख्य अतिथी मा. डॉ.राकेश गावतुरे, मा. प्रब्रम्हानंद मडावी मा. मुकेश गेडाम, मा.प्रियंका गेडाम.मा. अशोक येरमे यांचीही समायोचित भाषणे झाली*

*कार्यक्रमाची सुरुवात गुजरी चौक गोटूल येथील सल्ला-शक्ती स्थळाची पारंपरिक पूजा करून भव्य रॅली कन्नमवार सभागृहापर्यंत काढण्यात आली.*

त्यानंतर प्रबोधन कार्यक्रम पार पडले.महिलांनी स्वागतगीत तर वंदनगीत चिदानंद सीडाम आणि गौरव सिडाम यांनी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.कार्यक्रमाचे संचलन अरविंद मेश्राम तर आभार तेजस मडावी यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिदानंद सीडाम,मिथिलेश गेडाम,यश मडावी,मुकेश कनाके,नितीन कनाके, महेश आत्राम,गौरव सीडाम,राकेश कनाके, महेश आत्राम,विकी कुमरे तसेच बिरसा मुंडा बचत गट,राणी हिराई गट इत्यादींनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments