Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

मूल तालुक्यातील 400 किमी पांदण रस्त्यांचा होणार विकास, बळीराजा समृद्धी शेत रस्ते मोहीम Development of Pandan Roads

मूल तालुक्यातील 400 किमी पांदण रस्त्यांचा होणार विकास, बळीराजा समृद्धी शेत रस्ते मोहीम

मूल (अमित राऊत)
मूल येथे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली पांदण रस्ते मोकळे करण्यासंदर्भात आढावा सभा पार पडली. पालकमंत्री मातोश्री पांदण रस्ते योजने अंतर्गत शासनामार्फत बळीराजा समृद्धी शेतरस्ते मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 5000 किमी पांदण रस्त्यांचा विकास करण्यात येणार असून मुल तालुक्यातील अंदाजे 400 किमी पांदण रस्ते मोकळे करण्यात येणार आहेत. येत्या 2 दिवसात सर्व ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे पथक तयार करून सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत.

ही मोहीम 2 टप्प्यांमध्ये पार पाडण्यात येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये नकाशावर नोंद असलेले रस्ते व दुसऱ्या टप्प्यामध्ये जे रस्ते नकाशावर नोंद नाहीत परंतु त्यांचा पांदण रस्ते म्हणून वापर होत आहे किंवा ते पांदण रस्ते म्हणून विकसित होऊ शकतात अशा रस्त्यांचे प्रस्ताव सादर करण्याबाबत आदेश उपविभागीय अधिकारी यांनी या सभेत दिले. तसेच निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व गावांमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करून मतदार यादी वाचन व नवीन मतदारनोंदणी मोहीम राबविण्यासंदर्भात सर्व ग्रामसेवकांना सूचना देण्यात आल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, डॉ. रवींद्र होळी तहसीलदार मुल, गट विकास अधिकारी बी एच राठोड, नायब तहसीलदार नंदकिशोर कुंभरे, सर्व मंडळ अधिकारी, सर्व तलाठी, सर्व ग्रामसेवक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, सर्व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments